एमवे इंडिया एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने एमवेची ७५७ कोटी रुपयांहून अधिक संपत्ती जप्त केली आहे. ईडीने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत ही कारवाई केली आहे. तपासादरम्यान, ईडीला आढळले की एमवे डायरेक्ट सेलिंग मल्टी-लेव्हल मार्केटिंग नेटवर्कच्या नावाखाली ‘पिरॅमिड फसवणूक’ करत आहे. (ed raid on amway company)
तसेच कंपनीच्या सदस्यांच्या यादीत आणखी सदस्य जोडून त्यांनाच ते प्रोडक्ट विकत होते, अशी माहितीहीसमोर आली आहे. ईडीच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, एजंटांना एमवे कंपनीत सामील होण्यास सांगितले जाते. यानंतर त्यांना कंपनीकडून विकला जाणारा माल घेण्यास सांगितले जाते.
तसेच जो सदस्य जोडला जाईल त्याला अधिक नवनवीन सदस्य बनण्यास सांगितले जायचे. यावेळी नवीन सदस्यांनाच कंपनी हा माल विकायची, असा हा प्रकार सुरु होता. त्यावेळी ईडीने तपास केला असता ही ‘पिरॅमिड’ फसवणूक असल्याचे समोर आले. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे.
माहितीनुसार, कंपनीने आपल्या एजंटांना सांगितलेल्या तत्त्वानुसार कंपनीतल्या सदस्यांना नवीन लोकांना आपल्या कंपनीचा सदस्य बनवावे लागत होते. तसेच त्यांना कंपनीच्या वस्तु विकाव्या लागत होत्या. म्हणजेच, जो व्यक्ती या कंपनीचा सदस्य होईल त्याला कंपनीकडून विकल्या जाणाऱ्या वस्तू खरेदी कराव्या लागतील.
ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एमवेची ७५७ कोटी ७७ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यामध्ये एमवेच्या जमीन आणि कारखान्याच्या इमारती, प्लांट, मशिनरी, तसेच बँक खाती आणि तामिळनाडूच्या दिंडीगुल जिल्ह्यातील मुदत ठेवींचा समावेश आहे.
यापूर्वी देखील, ईडीने एमवे कंपनीतील वेगवेगळ्या ३६ बँक खात्यांमधून ४११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंपनी लोकांना आमिष दाखवत होती की ते आपल्या मोकळ्या वेळेत वस्तु विकू शकतात आणि त्यातून कोट्यवधी रुपये कमवू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
इफ्तार पार्टीत ‘या’ व्यक्तीने सलमान खानला बळजबरीने केला किस, व्हिडिओ पाहून चाहते झाले हैराण
सोनम कपूरच्या घरी करोडोंची चोरी करणाऱ्या आरोपींना अटक; चोरीचे कारण ऐकून धक्का बसेल
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजलने दिला मुलाला जन्म; सोशल मीडियावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव