Share

खोतकर, सरनाईक, गवळींची चौकशी का थांबवली? याचा अर्थ ईडी भाजपच्या दबावाखाली काम करतेय

high court

Politics: उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार(government) स्थापन झाले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाने विरोधकांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणेने (Central Investigation Agency) राज्यात विविध चौकशी सुरू केल्या होत्या.

यादरम्यान सुरू करण्यात आलेल्या सर्व आमदार आणि खासदारांच्या चौकशी आता बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यावरून आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, यामिनी जाधव, भावना गवळी या नेत्यांवर इडीची चौकशी सुरू होती. ती अचानक थांबली कशी? असा सवाल सध्या उपस्थित करण्यात आला आहे. सत्ताबदलाआधी ईडीनं ज्या ज्या नेत्यांची चौकशी केली त्या नेत्यांवरील आरोपांचं पुढं काय झालं.

त्यांच्यावरील आरोपांचा तपास कुठंवर आला आहे. तसेच इडीनं काही जुन्या शिवसैनिकांवर कारवाई केली होती. त्यांना समन्स देखिल पाठवण्यात आले होतो. त्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आणि उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली. यावेळी अनेक नेतेमंडळींनी शिवसेनेच्या दुसऱ्या गटात प्रवेश केला.

त्यानंतर इडीची कारवाई थांबली. त्यामुळे ईडीनं चौकशी केलेल्या आरोपांसंदर्भात चौकशी करून अहवाल देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून, ईडी पक्षपातीपणा करत आहे. त्यामुळे फौजदारी जनहित याचिका हायकाेर्टात दाखल करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now