गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांचा सपाटा सुरु असल्याचं दिसत आहे. यामध्ये प्रामुख्यानं महाविकास आघाडी सरकारमधील अनेक बडे नेते रडावर आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.
त्यानंतर शिवसेनेने केंद्रातील सरकार पदाचा दुरुपयोग करून त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेना आणि केंद्रातील भाजपा सरकार यांच्यातील संघर्ष येणाऱ्या काळात अधिक वाढणार असल्याचे चित्र आहे. अशातच पुन्हा एकदा शिवसेनेला ईडीचा दुसरा जबर धक्का बसला आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 11.36 कोटीची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने NSEL घोटाळा प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली आहे. या प्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई केली असून ठाण्यातील जमीन आणि दोन फ्लॅट जप्त केले आहेत.
सरनाईक यांच्यावर झालेल्या या कारवाईने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. NSEL घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग, 2002 च्या तरतुदींनुसार ED ने 2013 च्या FIR क्रमांक 216 च्या आधारे 30.09.2013 रोजी आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई पोलिसांनी NSEL प्रकरणात, त्याचे संचालक आणि NSEL चे प्रमुख अधिकारी, NSEL चे 25 डिफॉल्टर आणि इतरांवर मनी लाँड्रिंग तपास सुरू केला.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एनएसीएल घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून प्रताप सरनाईक यांना अनेक समन्स पाठवण्यात आले होते. सरनाईक यांची ईडीने आधी चौकशी केली होती. काही कागदपत्रंही तपासले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस नोंदवण्यात आली.
सरनाईक यांना त्यानंतर वारंवार समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नव्हते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरनाईक एकदा चौकशीला सामोरे गेले होते. त्यानंतर आज ईडीने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. तसेच ईडीने आतापर्यंत या घोटाळा प्रकरणी ३२५४.२ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीकडून पुढील तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘त्यांच्या घरात रोज पेनड्राईव्ह बाळंत होतात का? हे बघावं लागेल’, राऊतांचा फडणवीसांना टोला
‘द काश्मीर फाइल्स’ विरोधात कमेंट करणं बँक मॅनेजरला भोवलं, संतप्त नागरिकांनी उचललं टोकाचं पाऊल
नारायण राणे यांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुम्ही कधीही कॉल करा पण…’
जेलमध्येही चमकला सुरज! खुनाच्या आरोपाखाली झाली अटक, अभ्यास करून क्रँक केली IIT परिक्षा