राज्यात नाट्यमय घडामोडींना वेग आला असतानाच शिवसेनेना आणखी एक जबर धक्का बसला असल्याच समोर आलं आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या साखर कारखान्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.
जालन्यातील सहकारी साखर कारखान्याची जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ईडीने कारखान्याची जवळपास ७८ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. यात जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट, एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर अशी संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
याचबरोबर कारखान्याची २०० एकर जमीन आणि यंत्रसामग्री ईडीने जप्त केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी याच कारखान्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यानंतर आता या कारखान्याच्या जमिनीच्या जप्तीचा निर्णय ईडीकडून घेण्यात आला आहे.
ईडीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. तसेच खोतकर हे या कारखान्याच्या संचालक मंडळावर असल्याची माहिती मिळाली आहे. या कारखान्याच्या विक्रीचा व्यवहार चुकीच्या पद्धतीने व्यवहार करण्यात आल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. तर दुसरीकडे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदारांची संख्या वाढतच आहे. शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चर्चेची दारे खुले ठेवण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आतापर्यंत या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
महत्वाच्या बातम्या
शिंदे गटानं शिवसेनेचा डाव उलटवला; आता झिरवळ बंडखोरांची आमदारकी रद्द करूच शकत नाहीत
‘या’ चार नेत्यांमुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याचा निर्णय बदलला, जाणून घ्या
“शिंदे गटाने अजून पाठिंबा काढलेला नाही, त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अजूनही मजबूत”