गेल्या काही महिन्यांपासून नागराज मंजुळे चांगलेच चर्चेत आहे. त्यांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या झुंड चित्रपटाचे दिग्दर्शक केले आहे. नागराज मंजुळे हे दिग्दर्शकासोबतच एक लेखक, कवी, अभिनेते सुद्धा आहे. असे असताना आता मंजुळे हे फक्त आता नागराज मंजुळे नाही राहीलेले नाही, तर ते आता डॉ. नागराज मंजुळे झाले आहे. (dy patil university gaves nagraj manjule doctorate degree)
नागराज मंजुळे यांच्या नावासमोर ‘डॉक्टर’ लागलं आहे. नागराज मंजुळे यांना डी वाय पाटील विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ लेटर्स ही मानद पदवी बहाल करण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांना ही पदवी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
नागराज मंजुळे यांचे मित्र हनुमंत लोखंडे यांनी फेसबूक पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. सोबत डॉक्टरेट पदवी स्वीकारतानाचे नागराज मंजुळे यांचे काही फोटोही शेअर केले आहे. सध्या नागराज मंजुळे यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
त्या अंधारलेल्या दिवसात एम. फिल. सेट-नेट पूर्ण करण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न मला आजही आठवतात. तेव्हा तुम्ही असं काहीतरी साध्य करावं अशीच माझी इच्छा होती. तुम्ही अपयश पाहिलं पण संघर्षापूढे हार मानली नाही. तुमचा १० वी इयत्ता सोडल्यापासून ते डी. लिटपर्यंतचा एक अविश्वसनीय स्वप्नवत प्रवास आहे.
https://www.facebook.com/hanumantl1/posts/5253797794670535
अनेक चित्रपटांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांद्वारे सन्मानित झाल्यानंतर तुम्हाला डी वाय पाटील विद्यापीठाद्वारे डॉक्टर ऑफ लेटर्स ही पदवी प्रदान करण्यात येत आहे. याचा साक्षीदार होणं हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे, असे हनुमंत लोखंडे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, नागराज मंजुळे हे त्यांच्या दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखले जातात. पिस्तुल्या, फँड्री, सैराट आणि आता झुंड या सर्व चित्रपटांचं लोकांनी तोंडभरुन कौतूक केलं आहे. तसेच हे सर्व चित्रपट वास्तवाला भिडणारे आहे. त्यांच्या सैराट चित्रपटाने तर इतिहास रचत मराठी चित्रपटाच्या इतिहासात १०० कोटींचा टप्पा पार केला होता. त्याआधी फँड्री सिनेमाची देखील खुप चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या-
काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ पहा; ७ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; खांद्यावर मृतदेह ठेवून बाप १० किमी चालला
मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही; अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
क्रिकेटप्रेमींसाठी गुड न्युज! पुढच्या वर्षीपासून होणार महीलांची आयपीएल; वाचा संपुर्ण डिटेल्स..