रोहित शर्मा सर्वाधिक टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. तिसऱ्या टी २० सामन्यात (भारत विरुद्ध श्रीलंका) मैदानात उतरताच त्याने हा विश्वविक्रम केला. हा त्याचा १२५ वा टी-२० सामना होता. पण फलंदाजीत तो चमत्कार करू शकला नाही. (dushmanstha chameera get wicket of rohit sharma)
या सामन्यात खेळताना श्रीलंकेने ५ विकेट गमावून १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा कर्णधार रोहित ९ चेंडूत ५ धावाच करु शकला. त्याला वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराने बाद केले. तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने तिन्ही टी २० सामने जिंकून क्लीन स्वीप दिला आहे.
भारताने तिन्ही सामने जिंकले असले तरी वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमीराविरुद्ध रोहित शर्माचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही. दुसऱ्या टी २० मध्येही चमीराने रोहितला बोल्ड होते. टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, चमीराने रोहितला ३० चेंडू टाकले आणि ६ वेळा आऊट केले आहे. म्हणजेच प्रत्येक ५व्या चेंडूवर तो भारतीय कर्णधाराला पव्हेलियनमध्ये पाठवत आहे.
यादरम्यान रोहितला केवळ ३२ धावा करता आल्या. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला १७ चेंडूत एकही धाव करता आली नाही. IPL २०२२ साठी, के एल राहुलच्या नेतृत्वाखाली ३० वर्षीय चमीराचा लखनऊ सुपर जायंट्सने त्यांच्या संघात समावेश केला आहे.
लिलावात चमीराची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. लखनऊ सुपर जायंट्सने त्याला २ कोटी रुपयांना खरेदी केले. त्याच्या एकूण टी २० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, तिसऱ्या टी २० सामन्यापूर्वी त्याने ८६ डावांमध्ये २७ च्या सरासरीने ८८ विकेट्स घेतल्या आहेत.
१७ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने श्रीलंकेसाठी १२ कसोटी, ३९ एकदिवसीय आणि ४७ टी-२० सामने खेळले आहेत. IPL २०२२ ही २६ मार्चपासून सुरू होत आहे. म्हणजेच जवळपास एक महिना बाकी आहे. तर फायनल २९ मे रोजी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
युक्रेनमधील प्रत्येक भारतीयाची सुरक्षित घरवापसी करण्यासाठी.., ऑपरेशन गंगावर मोदींचे मोठे वक्तव्य
स्वत: प्रेमविवाह केला आणि बहिणीने आपला वर निवडला तर अक्षयने तोडले बहिणीशी संबंध
रोहित यशस्वी कर्णधार ठरण्यामागे आहे ‘या’ क्रिकेटपटूचा हात; माजी क्रिकेटपटूचा मोठा गौप्यस्फोट






