Share

नारायण राणे यांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले, ‘तुम्ही कधीही कॉल करा पण…’

udhav thackeray

राज्याच्या राजकरणात भाजप नेते नारायण राणे आणि शिवसेनेचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे. कोणताही मुद्दा उपस्थित झाला तरी राणे पिता – पुत्र थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष करतात हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. तसेच मुख्यमंत्री पदावरून भाजप – सेनेची युती तुटली.

त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. यामुळे बहुमत मिळून देखील भाजपला विरोधीपक्षात बसावे लागले आहे. या सर्व घडामोडींमुळे राणे विरुद्ध शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला केला. यांच्यात जोरदार आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले.

अशातच रत्नागिरी येथे नारायण राणे यांनी निधीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. असं जर तुम्हाला कोणी सांगितल्यास तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील कॉल लावला. हे वाचून उंचावल्या ना तुमच्याही भुवया..?

तुम्हाला हे वृत्त धक्का देणारं वाटेल पण जरा थांबा…नक्की काय झालं ते आता आम्ही तुम्हाला सांगतो… हे नारायण राणे ते नव्हेत. तर हे राणे सावंतवाडीतील शिवसेनेचा कार्यकर्ते आहेत. हे नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावचे नागरिक आणि माजी पंचायत समिती सदस्य आहेत.

गावातील विकास कामाला निधी मिळण्यासाठी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची त्यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर संपर्क झाल्याची माहिती दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी फोनवर संपर्क केला.

कॉलवर मुख्यमंत्री काय बोलले याची माहिती नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी ते म्हणाले, तुम्ही कधीही फोन करा, मी तुमचा फोन घेईन. पण, फक्त सावंतवाडीतून बोलतोय असं सांगा. कारण त्या नारायण राणे यांचा फोन मी घेत नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती राणे यांनी यावेळी बोलताना दिली.

उदय सामंत यांची भेट घेतल्यानंतर नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, ‘मला उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कुणाचीही गरज पडत नाही. मी त्यांना थेट भेटतो. यावेळी त्यांनी ठाकरे यांनी बांधलेले शिवबंधन देखील अभिमानाने दाखवलं.’ दरम्यान, भाजप नेते नारायण राणे यांनीच मुख्यमंत्री ठाकरे यांना कॉल केला, असा अनेकांचा समज झाल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या
नात्याला काळीमा फासणारी घटना! फिरायला चल असं सांगून गर्भवती पत्नीला बाहेर नेलं अन्.., वाचून हादराल
‘या’ आहेत जगातील ५ सर्वात सुंदर महिला क्रिकेटपटू, फोटो पाहून लागेल वेड
सलमान खानचा आणखी एक कांड उघड, कोर्टाच्या आदेशानंतर भाईजानच्या अडचणी वाढल्या
VIDEO: लहान मुलाने तब्बल 5 फुटांच्या सापाशी घेतला पंगा, व्हिडीओ पाहून तुमचाही उडेल थरकाप

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now