Share

डुग्गूच्या अपहरणकर्त्याचे पुणे पोलिसांनाच आव्हान, पोलिस चौकीपासूनच झाले होते अपहरण

जानेवारी महिन्यात पुण्यातील बालेवाडीच्या हाय स्ट्रीट भागातून ज्या ४ वर्षीय डुग्गूचे अपहरण करण्यात आले होते तो आठ दिवसानंतर सापडला. गेल्या आठ दिवस हा मुलगा कोठे होता नेमकं काय झालं याची माहिती पोलिसांनी दिली होती. तब्बल साडेतीनशे पोलिस अधिकाऱ्यांचे तपास पथक डुग्गूला शोधत होते. (duggu kidnapper challenge to police)

डुग्गू म्हणजेच स्वर्णव चव्हाणच्या अपहरणकर्त्याची शोधाशोध सुरु आहे, पण त्यांचा अजूनही तपास लागलेला नाही. आता मोकाट फिरणाऱ्या अपहरणकर्त्यांनीच पुणे पोलिसांना आव्हाण दिले आहे. स्वर्णवच्या अपहरणाला ११ फ्रेब्रुवारी रोजी एक महिना पुर्ण होणार आहे.

असे असतानाही पुणे पोलिसांच्या जाळ्यात आरोपी अडकलेला नाहीये. तांत्रिक तपासात अडकून खबऱ्यांना दुर्लक्ष केल्यामुळे पोलिसांना अपयश आल्याचे म्हटले जात आहे. स्वर्णवचे ११ जानेवारीला अपहरण करण्यात आले होते. तब्बल ९ दिवस त्याचा शोध सुरु होता. शेवटी अपहरणकरताच १९ जानेवारीला स्वर्णवला एका इमारतीच्या वॉचमनकडे सोडून गेला होता.

अपहरणकर्त्याला पकडल्याशिवाय हा तपास थांबणार नाही, पुढीला दोन दिवसांतच त्याला पकडले जाईल, असे पोलिसांनी म्हटले होते. आता अपहरणाला एक महिना पुर्ण होत आहे, असे असतानाही अपहरणकर्ते मोकाट फिरत असून पुणे पोलिसांच्या हाती ते लागलेले नाही.

पुणावळे येथे अपहरणकर्त्याने स्वर्णवला सोडले. तेथील लांबवरचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झालेल आहे. तो स्वर्णवला पायी चालत घेऊन आला होता. परत जाताना तो निवांतपणे चालत होता. त्याने काळे जॅकेट घातलेले होते. त्यामुळे केवळ त्याची इतरांपेक्षा चालण्याची वेगळी पद्धत होती. याशिवाय कोणताही धागा पोलिसांना भेटलेला नाही.

सोशल मीडियावर या अपहरणकर्त्याची खुप चर्चा रंगली आहे. ९ दिवस स्वर्णव सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. पुणावळे परिसरातील इमारतीच्या वॉचमनजवळ सोडून गेला. तसेच त्याने तिथे बॅगही ठेवली होती, त्यावर मुलाच्या वडिलांचा नंबर दिलेला होता.

महत्वाच्या बातम्या-
डोळ्यात ओलावा, थरथरणारी जीभ; विरोधकांवर निशाणा साधताना मोदी झाले भावूक, म्हणाले..
महाराष्ट्राच्या ‘या’ विभागात अतिवृष्टी होणार, हवामान खात्याने शेतकऱ्यांना दिला ‘हा’ महत्त्वपूर्ण इशारा
ऐश्वर्या रायने लता मंगेशकरांवर केला प्रेमाचा वर्षाव, ‘आजी’ला आठवून श्रद्धा कपूरही झाली भावूक

राज्य

Join WhatsApp

Join Now