Share

ब्रेकींग! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदाराचा अचानक मृत्यू; कारणही आले समोर

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कार्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात अडकल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. तपासात अनेक धागेदोरे सापडत असल्याने हे प्रकरण अधिक गाजले. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एनसीबीचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यु झाला आहे. (drugs case witness prabhakar sail death)

शुक्रवारी प्रभाकर साईल यांचं निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांचे चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाणार आहे.

अंधेरीतच त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रभाकर साईल चर्चेत येण्याचं कारण म्हणजे, त्यांनी आर्यन खान प्रकरणात एक मोठा गौप्यस्फोट केला होता. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात ज्या क्रूझवरून अटक करण्यात आली होती. त्या क्रूझबाहेर आपण हजर होतो, असा दावा प्रभाकर यांनी केला होता.

त्यानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगत संरक्षणासाठी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली होती. दरम्यान, त्यांनी माध्यमांसमोर येत ड्रग्ज प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यावेळी ते किरण गोसावीचे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्या दाव्याने महाराष्ट्र राजकारणात खळबळजनक वातावरण निर्माण झालं होतं.

त्यांनी त्यावेळी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले होते. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी माध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती,असा दावाही प्रभाकर साईल यांनी केला होता.

तसेच, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही प्रभाकर यांनी सांगितले होते. अशात अचानक प्रभाकर साईल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाला आहे. त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या मृत्युबाबत संशयही व्यक्त केला आहे.

महत्वाच्याा बातम्या-
फक्त बुद्धिमानच लोक ‘या’ चित्रात किती बिबटे आहेत शोधून काढू शकतात; मग बघा तुम्हाला दिसतो आहे का?
चित्रपट न पाहताच आभिषेक बच्चनने दिली द काश्मिर फाईल्सवर प्रतिक्रिया, म्हणाला, काहीही बोला पण तुम्हाला..
महिलांवर होणारा अन्याय नाही बघवला, दोन मुलांची आई बनली PSI; औरंगाबादच्या रेणूकाची यशोगाथा वाचून व्हाल थक्क

ताज्या बातम्या बाॅलीवुड राज्य

Join WhatsApp

Join Now