Share

आमची बौद्ध विहारं पाडून मंदीरे, मशिदी बनवल्या, आमची विहारं परत द्या; आगलावेंची मागणी

सध्या ज्ञानवापी मशिदीचं प्रकरण पुर्ण देशात गाजत आहे. त्याची केस सध्या कोर्टात सुरू आहे. हे प्रकरण सुरू असतानाचा महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक आणि अभ्यासक डॉ. प्रदीप आगलावे यांनी असा दावा केला आहे की, समस्त वारकऱ्यांचं अराध्य दैवत असलेलं पंढरपुरचं विठ्ठल मंदिर हे पुर्वी बौद्ध धर्माचं विहार होतं.

त्यांच्या म्हणण्यानुसार आजही विठ्ठल मंदिरातील भिंतींवर भगवान बुद्धांच्या मुर्ती आहेत, यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरूपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य प्रसिद्ध मंदिरे ही पुर्वीची बौद्ध विहारे होती असाही खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

आमची विहारं पाडून मंदिरं आणि मशिदी बनवल्या असा आरोप डॉ. आगलावे यांनी केला आहे. आगलावे यांच्या या दाव्यानंतर राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉ. आगलावे यांनी काही मागण्याही केल्या आहेत. ते म्हणाले की, वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरात हिंदु देवी देवतांच्या मुर्ती सापडल्याचा दावा केला जातोय.

ज्ञानवापीचं सर्वेक्षणही केले जात आहे. याच धर्तीवर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरावरही अभ्यास होण्याची गरज आहे. येथील मंदिराचा इतिहास, येथील भिंतींवरील मुर्ती आदी गोष्टींचा बारकाईने अभ्यास व्हायला हवा. तसेच ते पुरोहितांकडून बौद्ध लोकांच्या हाती द्यावे, अशी मागणी आगलावे यांनी केली आहे.

डॉ. आगलावे हे ज्येष्ठ साहित्यीक आणि डॉ. आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव आहेत. त्यांनी काही दावे केले आहेत आणि त्या दाव्यांनुसार मागण्या केल्या आहेत. पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे पुर्वी बौद्ध धर्माचे विहार होते. यासह ओडीसातील जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी, उज्जैन महाकाली यासह असंख्य मंदिरे ही पुर्वीची बौद्ध विहारे होती.

आमची विहारं पाडून मंदिरे, मशिदी बनवल्या गेल्या. ज्ञानवापीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमची विहारं परत द्या. संशोधकांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मंदिरं ही पुर्वीची बुद्ध विहारे हे सिद्ध झालेलं आहे. प्रबोधनकार केशव ठाकरे यांनी देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे या पुस्तकात लिहीले आहे की, ठिकठिकाणाच्या बौद्ध विहारांतील पवित्र वास्तूंचा आणि बौद्धमुर्तींचा  उच्छेद केला आणि तेथे शंकराच्या पिंड्या थापल्या.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका भाषणाचा संदर्भ देत डॉ. आगलावे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी एका भाषणात म्हणाले की, पांडुरंग म्हणजे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून दाखवेन.

महत्वाच्या बातम्या
‘बायको विकणे आहे’, ‘या’ कारणामुळे नवऱ्याने बायकोच काढली विकायला; थेट जाहिरातच दिली
कान्स महोत्सवातील अमृता फडणवीसांचा लूक चर्चेत; पहा रेड कार्पेटवरचे रॅम्पवाॅकचे खास फोटो
यासिन मलिकला जन्मठेप दिल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट; शाहिद आफ्रिकीने ओकली गरळ
शिखर धवनला वडिलांनी पोलिसांसमोरच केली लाथा-बुक्क्यांनी मारहाण, धक्कादायक कारण आले समोर

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now