फोनवर १००-२०० रुपयांचे स्क्रीन गार्ड लावण्याआधी जाणून घ्या त्यामागचे सत्य; परत नाही करणार ‘ही’ घोडचूक

आजकाल लोक नवीन फोन खरेदी करताना दिसतात, त्यात अनेकजण महागडे फोन खरेदी करत असतात. पण बहुतेक लोक त्यावर टेम्पर्ड ग्लास बसवतात जेणेकरून फोनची स्क्रीन सुरक्षित केली जावे. पण अशा लोकांची संख्या खूपच कमी आहे ज्यांना माहित आहे की स्क्रीन गार्ड मोबाईलला हानी पोहोचवत असते. (dont use tempered glass)

या टेम्पर्ड ग्लासमुले कॉलिंगमध्ये त्रास तर होतोच, पण यूजर्सला आपला फोन खराब झाल्याचे जाणवू लागते. तसेच यामुळे मोबाईलचा टचही खराब होऊ लागतो. आज आम्ही तुम्हाला हे का घडते आणि यापासून तुम्ही तुमचा फोन कसा वाचवू शकतात, याबद्दल सांगणार आहोत.

नवीन स्मार्टफोन्समध्ये आधुनिक टच डिस्प्ले दिला जात आहे, ज्या अंतर्गत ऍम्बियंट लाइट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर असते. पण जेव्हा आपण आपल्या फोनवर स्क्रीनगार्ड लावतो तेव्हा हे सेन्सर ब्लॉक होतात आणि काम करणे थांबवतात. यामुळे फोन कॉल करताना स्क्रीन लाइट डिस्टर्ब होऊ लागते आणि बोलत असताना तुमच्या फोनमध्ये दुसरे ऍप उघडते. याशिवाय ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट असल्यास स्मार्टफोन अनलॉक करण्यात अनेक अडचणी येतात. तसेच फोन अनलॉक होण्यास वेळ लागतो.

आता काही लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल की अशा स्थितीत फोनचा सेन्सर ब्लॉक होणार नाही आणि डिस्प्लेही सुरक्षित राहण्यासाठी काय करावे? तर जाणून घ्या की ही समस्या अधिकतर अशा स्मार्टफोन्समध्ये येते ज्यावर कमी क्वालिटीचा स्क्रीन गार्ड बसवला जातो.

भारतात कमी क्वालिटीच्या स्क्रीन गार्ड बसवणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. म्हणूनच तज्ञ नेहमी चांगल्या कंपनीकडून स्क्रीन गार्ड वापरण्याचा सल्ला देतात. आता तुम्ही जेव्हा जेव्हा फोन खरेदी करता तेव्हा त्याच कंपनीचा स्क्रीन प्रोटेक्टर घ्या. कारण कंपन्यांनी सेन्सर कुठे बसवला आहे हे माहीत असते. हे लक्षात घेऊन कंपन्या स्क्रीनगार्ड बनवतात.

जेव्हा तुम्ही उन्हात जाता तेव्हा तुमच्या स्मार्टफोनचा स्क्रीन लाइट प्रकाशानुसार आपोआप मोबाईलच्या सिस्टिममध्ये होतो. हे ऍम्बियंट लाइट सेन्सरमुळे होते. त्याच वेळी, फोन कमी प्रकाशाच्या ठिकाणी असल्यास, फोनचा प्रकाश आपोआप कमी होतो. प्रॉक्सिमिटी मोबाईल सेन्सरबद्दल बोलायचे झाले तर, जेव्हाही तुम्ही फोन कानाजवळ घेता तेव्हा त्याचा लाईट बंद होतो.

महत्वाच्या बातम्या-
आजोबांचा नाद नाय! वयाच्या 65 व्या वर्षी सुरू केली औषधी वनस्पतींची शेती, आता कमावतात लाखोंमध्ये
‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ५० हजार रुपये; ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी विवेक अग्निहोत्रींकडे मागितले ‘एवढे’ रूपये, प्रसिद्ध अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा