Share

गाढविनीच्या दुधापासून बनवलेले पनीर असते सोन्यापेक्षा महाग, किंमत वाचून चक्रावून जाल

दुग्धजन्य पदार्थांचे अनेक फायदे आपल्याला होतात. अनेक पोषक तत्वे जसे कि कैलशियम, मैग्नीशियम आणि जिंक दुधामध्ये असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असतात. दुधापासून बनविला जाणारा पदार्थ म्हणजे पनीर. आपल्या सर्वांना माहिती आहे की पनीर हे गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापासून बनवले जाते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले तर की गाढवीनीच्या दुधापासूनही पनीर तयार केले जाते हे सांगितले तर विश्वास बसणार नाही. चला तर मग जाणुन घेऊयात.

गाढव हा ओजी वाहण्यासाठी असतो. हेच आपल्याला माहित आहे. पण गाढवीनीच्या दुधापासून पनीर तयार केले जाते. आणि हे जगातील सर्वांत महाग पनीर आहे. युरोप मधील सर्बिया या देशातील पनीर सर्वांत महाग विकल्या जाते. याची खास गोष्ट ही आहे कि हे पनीर बनवण्यासाठी गाढवीनीच्या दुधाचा उपयोग केला जातो.

तसेच या पनीरची किंमत सोन्याचा किंमतीएवढी जास्त आहे. सर्बिया मधील हे पनीर जवळजवळ ७८००० रु प्रती किलो ने विकले जाते. जगातील हे सर्वात महाग पनीर समजल्या जाते. जे युरोपीय देश सर्बियामधील एका फार्महाउस मध्ये बनवल्या जाते. या पनीरचे उत्पादन सुद्धा फार कमी होते. म्हणूनच याला दुर्लभ पनीर सुद्धा सजले जाते.
हे पनीर बनवण्यासाठी गाढवाच्या एका विशिष्ट जातीच्या दुधाचा वापर केला जातो.

भारतात गाय- म्हैस यांच्या दुधापासून बनवल्या गेलेल्या पानिराला ३००/६०० रु प्रती किलो भाव मिळतो. परंतु सर्बियातील गाढवाच्या दुधापासून बनवल्या गेलेल्या पानिराला तब्बल ७८००० रु प्रती किलो एवढा भाव आहे. एवढ्या जास्त भावाने विकल्या जाणारे हे जगातील पहिले पनीर आहे.

गाढवीनीच्या दुधाचे पनीर सुद्धा सर्बियात अत्यंत कमी प्रमाणत उपलब्ध आहे. पण बाजारात याची मागणी उत्पादनापेक्षा जास्त असल्यामुळे हे पनीर महाग आहे. दुसरे कारण म्हणजे या पानिरमध्ये असलेल्या खास गुणांमुळे या पनीरची किंमत एवढी महाग आहे. गाय आणि म्हशीपासून बनवलेल्या पनिरपेक्षा या पनिरमध्ये काही विशिष्ट गुणधर्म सापडतात.

एका फार्य हाउसमध्ये हे पनीर तयार केले जाते. जैसाविका हे या फार्म हाउसचे नाव असून हे फार्म हाउस उत्तर सर्बियामध्ये आहे. या फार्म हाउसचे मालक स्लोबोदान सिमिक हे आहेत. जेथे मोठ्या प्रमाणत गाढवांचे पालन केले जाते. गाढवीनीच्या दुधाचे पनीर याच ठिकाणी बनवले जाते.

बाल्कन प्रजातीच्या गाढवीनीच्या दुधापासून या पनीरची निर्मिती केली जाते. कारण फक्त त्यात प्रजातीच्या गाढविणीचे दुध सर्वांत पौष्टिक मानले जाते. या प्रजातीचे गाढव जास्त करून सर्बिया आणि मोन्टेनेग्रो मध्ये पाहायला मिळतात. स्लोबोदान सिमिक हे या फार्म हाउसमध्ये जवळपास २०० पेक्षाही जास्त गाढवांचे पालन करतात. भारतातील जर्शी गाय एका दिवसात ३० लिटर दुध देते.पण एक गाढवीन एक लिटर दुध सुद्धा मोठ्या मुश्किलीने देते.

या फार्म हाउसमधील सर्व गाढवांचे दुध मिळून १५ / २० लिटर दुध होते. ज्यातून १०/१२ किलो पनीरची निर्मिती शक्य आहे. तसेच या सर्वच गाढवीनीच्या दुधापासून पनीरची निर्मिती होत नाही. सिमिक यांच्या मते गाढवीनमध्ये आईच्या दुधासारखे गुणधर्म असतात. अस्थमा आणि ब्रोंकाइटीसिड या आजारांनी ग्रस्त असलेले पेशंट याचा वापर करतात.

या पनीरचे उत्पादन जरी फार कमी असेल तरी सुद्धा अनेक लोक पनीर खरेदी साठी अगोदरच ऑर्डर देऊ ठेवतात. यामुळेच या पनीरच भाव हा सोन्यापेक्षाही महाग होत चालला आहे. सर्बियातील फार्म हाउस मध्ये गाढवीनीच्या दुधापासून साबण आणि दारू सुद्धा बनवली जाते. जगातील मोजक्याच देशात गाढवीनीच्या दुधापासून पनीर निर्मिती केली जाते.

महत्वाच्या बातम्या
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘हा’ अभिनेता अजूनही राहतो चाळीत, घराचा खास व्हिडीओ शेअर म्हणाला…
PHOTO: सोफ्यावर झोपून अभिनेत्रीने काढली शर्टची बटणे, काळ्या ब्रामधील पोझने चाहते झाले थक्क
बावरे प्रेम हे! मुलीने केलं बॉयफ्रेंडच्या मृतदेहासोबत लग्न, कारण वाचून तुम्हीही व्हाल भावूक 
संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर पालखी मार्गासाठी पंतप्रधान मोदींनी केली मोठी घोषणा; वाचा काय म्हणाले..

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now