Share

…तर केकेचा जीव वाचला असता; पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके (वय ५३) यांचे ३१ मे २०२२ च्या रात्री निधन झाले आहे. कोलकाता येथे लाइव्ह परफॉर्मन्सदरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. केकेंच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. (doctor shocking statement on kk death)

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हृदयविकाराच्या झटक्याने केकेंचे निधन झाले आहे. लाईव्ह परफॉर्मन्सदरम्यान केके यांना अस्वस्थ वाटू लागले होते. मंगळवारी ५ वाजता हा शो सुरु झाला होता. कार्यक्रमानंतर ते आपल्या हॉटेलमध्ये परतले होते. त्यावेळी पुन्हा त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

केकेंचा पोर्स्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा आता समोर आला आहे. त्यामध्ये केकेचे निधन हृदयविकाराच्या झटक्यामुळेच झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच केके यांना हृदयसंबंधी आजार होता अशी माहितीही पोर्स्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आली आली आहे.

आता रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी हैराण करणारा खुलासा केला आहे. केके यांना जर वेळेत सीपीआर मिळाला असता, तर त्यांचा जीव वाचला असता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे हॉटेलमधून केकेंना रुग्णालयात नेण्याआधी जर सीपीआर मिळाला असता, तर त्यांचा जीव वाचला असता, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

पोर्स्टमॉर्टम रिपोर्टनुसार, केकेच्या हृदयात ब्लॉकेज झाल्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. कॉन्सर्टमधल्या अतिउत्साहामुळे त्यांचा रक्तप्रवाह थांबला होता. त्यामुळे त्यांना हार्टअटॅक आला. जर त्यांना वेळेत सीपीआर दिला असता, तर त्यांचा जीव वाचला असता, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

केके यांच्या जाण्याने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांच्या अशा अचाकन जाण्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे, कलाकांरांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. केके यांनी त्यांच्या गाण्यांनी सगळ्यांनाच भुरळ घातली होती.

महत्वाच्या बातम्या-
सासरच्या त्रासाला कंटाळून आली माहेरी, UPSC पास करत देशात पटकावला १७७ वा क्रमांक
IAS झाला म्हणून पुर्ण गावात वाटले पेढे, पण सत्य समोर आल्यानंतर आला हार्ट अटॅक, तुटले स्वप्न
शर्यत भरवली भाजपच्या लांडगेंनी पण घाटात जलवा मात्र राष्ट्रवादीच्या शेळकेंचाच; बोलेरोही त्यांनीच पटकावली

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now