अनेक लोक डॉक्टरांना देव म्हणत असतात, कारण ते अनेकदा रुग्णांचे जीव वाचवत असतात. आता अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील आग्रामधून समोर आली आहे. तिथल्या एतमादपूरमध्ये एका सरकारी महिला डॉक्टरने नवजात मुलीला तोंडातून ऑक्सिजन देऊन तिचा जीव वाचवला आहे. (doctor save new born baby)
महिला डॉक्टरने नवजात बालकाला तोंडाने श्वास दिला. इतकेच नाहीतर नवजात बाळाचा रडण्याचा आवाज येईपर्यंत महिला डॉक्टर प्रयत्न करत होत्या. अखेर डॉक्टरांच्या प्रयत्नाने नवजात बालकाला जीवदान मिळाले. हे प्रकरण आग्रा येथील एतमादपूर सामुदायिक आरोग्य केंद्रातील आहे.
खुशबू नावाच्या महिलेने एका मुलीला जन्म दिला, मात्र नवजात बाळाला श्वास घेता येत नव्हता. त्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये प्रसूती करणाऱ्या डॉ. सुरेखा चौधरी यांनी मशीनमधून नवजात बालकाला ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला, पण तोही अपयशी ठरला. यानंतर डॉ. सुरेखा यांनी नवजात बालकाला तोंड लावून श्वास देण्यास सुरुवात केली.
घडत असलेला सर्वप्रकार पाहून तेथे उपस्थित कर्मचारी हैराणच झाले. एका कर्मचाऱ्याने त्याचा व्हिडिओ बनवला आहे. सुरेखा रक्ताने माखलेल्या नवजात बालकाला श्वास देत होत्या. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि नवजात बाळाला जीवदान देण्यात त्या यशस्वी झाल्या.
डॉ. सुरेखा यांनी सांगितले की, त्यांनी नवजात बालकाला तोंडातून सात मिनिटे श्वास दिला, त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि नवजात मुलीचा श्वासोच्छवास सुरू झाला. यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी आणि तिच्या आईने डॉक्टरांचे आभार मानले आहे.
यासंबंधीचा २ मिनिटे ५० सेकंदांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबत डॉ. सुरेखा चौधरी म्हणाल्या, सुरुवातीला नर्सने नवजात बालकावर प्राथमिक उपचार केले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. शेवटी मी तोंड बंद करून किमान सात मिनिटे बाळाला श्वास देऊ दिला.
महत्वाच्या बातम्या-
केंद्र सरकारची भन्नाट योजना, जन धन खाते धारकांना दर महिन्याला मिळणार तीन हजार रुपये
१२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा, एका लाखाचे झाले १.६४ कोटी रुपये
‘देवमाणूस’मधील ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता अजूनही चालवतो रिक्षा, कारण वाचून डोळे पाणावतील