राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्या हे सातत्याने शिवसेना नेत्यांवर टीका करत होते. थेट पत्रकार परिषद घेत घोटाळ्याचे पुरावे जाहीर करत होते. शिवसेना नेते प्रताप सरनाईकांवर देखील विहंग गार्डन या इमारतीच्या मुद्यावरुन किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केले होते.
हा वाद थेट सोमय्या विरुध्द सरनाईक यांच्यातील संघर्ष थेट न्यायालयार्पयत गेला आहे. मात्र आता राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं आहे. शिंदे गटात प्रताप सरनाईक यांचा देखील समावेश आहे. यामुळे आता एकेकाकी एकमेकांचे विरोधक असणारे आता एकाच सरकारमध्ये एकत्र आले आहे.
गुरुवारी माध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी म्हंटलं आहे की, ‘आपले काळचक्र फिरले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्याच काय आता कोणाच्याही व्यासपीठावर जायला मी मोकळा असल्याचे सूचक व्यक्तव्य सरनाईक यांनी केले आहे. एमएमआरडीएने देखील शपथपत्रत सुरक्षा रक्षकांच्या बाबतीत असा कोणताही घोटाळा न झाल्याचे सांगितले आहे.
यामुळे ईडीची चौकशी मागे लागली. सर्वोच्च न्यायालयाने मला सरंक्षण दिले. काही दिवसांपासून सरनाईक यांच्या घरी सीआरपीएफचे जवान घरी आले होते. याबाबत बोलताना त्यांनी म्हंटलं आहे की, माझ्या चौकशीसाठी जे सीआरपीएफचे जवान माझ्या घरी आले होते. तेच जवान आज माझ्या सुरक्षेसाठी आहेत.
काळ कोणासाठी कधी थांबेल आणि काळचक्र हे कसे फिरेल हे सांगता येत नाही. सोमय्या यांच्याविरोधातील लढाई ही न्यायालयात सुरुच राहिल. मात्र त्यांच्या बरोबर व्यासपीठावर बसायचे की नाही, हा नंतरचा प्रश्न असल्याचेही प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितलं.
दरम्यान, पुढे बोलताना प्रताप सरनाईकांनी सांगितलं आहे की, ‘डोंबिवलीचा रिक्षावाला आमदार आहे आणि ठाण्यातील रिक्षावाला राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्यामुळे रिक्षावाल्यांना चांगले दिवस आले असल्याचेही दिसत आहे.’ ठाकरे सरकार असतांना राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस वाढत असल्यामुळे सर्व आमदारांच्या मनात खदखद होती, अशी माहिती त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
२५ पैशांची जुनी नाणी रातोरात बदलू शकतात तुमचं भविष्य; १ मिनिटात होऊ शकता लखपती, कसं ते जाणून घ्या
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला एकत्र आणण्यासाठी ‘ही’ अभिनेत्री मैदानात, मोदींना घातलं साकडं
‘घरात घुसून मारलं होतं ना..’; या बॉलिवूड दिग्दर्शकावर संतापली कंगना राणावत
जबरदस्त प्रेमकहाणी आणि सुपरहिट ऍक्शन, वाचा थॉर: लव्ह ऍन्ड थंडरचा रिव्ह्यु