मुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारताच शिंदेंनी ‘या’ निर्णयाची केली घोषणा; भाजपला होणार फायदा

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार मोठ्या जोमाने कामाला लागलं आहे. राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोठं – मोठे निर्णय घेताना पाहायला मिळत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आधीच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये देखील बदल करण्यात येत आहे.

तर आधीच्या सरकारने घेतल्या निर्णयांना स्थगिती देखील नव्या सरकारकडून देण्यात येत आहे. गुरुवारी नगरपालिका आणि नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, तसेच ग्रामपंचायतींच्या सरपंचांची थेट म्हणजेच जनतेमधून निवड करण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला.

ठाकरे सरकारच्या आधीच्या सरकारने म्हणजेच भाजप-शिवसेना युतीच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट जनतेतून नगराध्यक्ष, सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, 2019 मध्ये युतीची सत्ता गेली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालं.

त्यानंतर ठाकरे सरकार मधील नेत्यांनी युतीचा हा निर्णय रद्द केला. अन् ठाकरे सरकारने पुर्वीची पध्दत अवलंबली. तर आता पुन्हा राज्यात नवं सरकार आलं असून नगरपालिका आणि नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, तसेच ग्रामपंचायतींच्या सरपंचांची थेट म्हणजेच जनतेमधून निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मात्र याच निर्णयाला पूर्वी एकनाथ शिंदे यांनी विरोध केला होता. कायद्यात बदल करण्यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेले विधेयक मंजुरीला आले असता तत्कालीन नगरविकासमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनीच थेट नगराध्यक्षाच्या निवडीने कसा गोंधळ होतो, याबाबत युक्तिवाद केला होता.

याचबरोबर नगराध्यक्षांची निवडणूक नगरसेवकांमधूनच करणे कसे योग्य आहे, असे देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. मात्र आता राज्यात पुन्हा सत्तांतर होताच एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेत बदल झालेला पाहायला मिळाला. आता घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा भाजपला होणार आहे.

याचे कारण असे की, २०१६-१७ मध्ये नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक घेण्यात आली असता, त्याचा भाजपला मोठा फायदा झाला होता. राज्यात २०१६-१७ मध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष हे भाजपचे निवडून आले होते. आताही भाजपलाच फायदा होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
केसरकर म्हणाले, मी पवारांबद्दल कधीही अपशब्द काढला नाही, आव्हाडांनी ‘तो’ किस्सा सांगत केली पोलखोल
जोपर्यंत हे किंग, बादशाह, सुलतान आहेत तोपर्यंत सिनेमा बुडतच राहणार, प्रसिद्ध दिग्दर्शकाचा टोला
सलमानचा भाव वाढला, बिग बॉससाठी वाढवली फी, आता घेणार तब्बल ‘एवढे’ कोटी
तिच्या डोळ्यात रोज पाणी असतं, तुम्ही तुमच्याच लोकांवर.., सायना नेहवालचा नवरा भडकला