विरोधकांवर टीकेची झोड उठवणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे आता आपल्याच पक्षातील नेत्यांना तिखट शब्दात लक्ष्य करताना पाहायला मिळत आहेत. याचे निमित्त ठरले, शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेला बंड..! गेल्या सहा दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक नाट्यमय घटना घडत आहेत.
यामुळे आता शिवसेना विरुद्ध शिवसेना यांच्यातच शाब्दिक आखाडा रंगला आहे. बंडखोर आमदारांना लक्ष करताना संजय राऊत यांची जीभ घसरताना पाहायला मिळत आहे. तर बंडखोर आमदार देखील राऊत यांना सणसणीत प्रत्युत्तर देताना पाहायला मिळत आहे.
‘कब तक रहोगे गुवाहाटी में, कभी तो आओगे चौपाटी में…’, नुकतच राऊत यांनी बंडखोर आमदारांना लक्ष करताना हे आव्हान दिलं. यावर आता बंडखोर आमदार सिंधुदुर्गातील आमदार आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नुकतीच एका मराठी वृत्तवाहिनीला केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना केसरकर यांनी सध्या घडणाऱ्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिलेली आहे. यावेळी ‘संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहताय? असा सवाल केसरकर यांना विचारण्यात आला. याबद्दल बोलताना केसरकर यांनी म्हंटलं आहे की, राऊतांच्या भाषेमुळेच शिवसेनेला सत्ता गमवायची स्थिती निर्माण झाली, असं केसरकर म्हणाले.
पुढे बोलताना केसरकर यांनी म्हंटलं आहे की, ‘राऊत नेहमी भडक भाषा बोलत राहिल्यामुळे शिवसेनेला सत्ता गमवायची परिस्थिती निर्माण झाली. बाळासाहेबांच्या नेतृत्त्वात 40-50 वर्षे कामं केली, त्या लोकांनाही तुम्ही आज ज्या पद्धतीने बोलताय, ज्यांच्या जीवावर तुम्ही राज्यसभेचे सदस्य आहात, त्यांच्याबद्दल असं बोलणार?.’
दरम्यान, आज देखील संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा एक व्हिडीओ शेअर करत गुलाबराव पाटील, दीपक केसरकर आणि शहाजीबापू पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील यांचा व्हिडीओ शेअर करत राऊत म्हणतात की, बाप बदलण्याची भाषा कोण करतंय पाहा.
दीपक केसरकर थोडा संयम पाळा. डोंगर, झाडी आणि निसर्ग यात विवेक हरवू नका. आपण यांना ओळखता ना, जय महाराष्ट्र, असे राऊतांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. यामुळे आता राजकारण चांगलच तापलं आहे. संजय राऊत सध्या चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
सेनेतून बंडखोरी करण्यासाठी माझ्याकडे गाड्या भरुन पैसे आले; शिवसेना आमदाराचा खळबळजनक दावा
पक्ष वाचवण्यासाठी पती उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून रश्मी ठाकरे उतरल्या मैदानात; ‘अशी’ आखली रणनीती
बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्यासाठी मरण आलं तरी चालेल, पण…; एकनाथ शिंदेंनी फोडली डरकाळी
एकेकाळी मुख्यमंत्र्यांचा जाहीरपणे समाचार घेणाऱ्या खासदाराचा आता ठाकरेंना पाठिंबा; म्हणाले..