मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अखेर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. शिंदेंनी भाजपसोबत हात मिळवणी करत सरकार स्थापन केले. गुरुवारी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहे. (dipak kesarkar warning uddhav thackeray)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठा सत्तासंघर्ष सुरु होता अखेर तो थांबला आहे. पण शिवसेना बंडखोर आमदारांवर कारवाई करणार आहे. त्यामुळे आता नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. शिवसेनेने कारवाई मागे घ्यावी, त्यांनी ती कारवाई मागे घेतली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषद घेऊन दीपक केसरकर यांनी आपली भूमिका मांडली आहे. ज्या प्रकारची नोटीस एकनाथ शिंदे यांना शिवसेनेकडून पाठवण्यात आली आहे. त्या संदर्भात आम्ही सेनेला रितसर पत्र पाठवू. जर त्यांनी कारवाई मागे घेतली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे केसरकर यांनी म्हटले आहे.
नेते पदावरुन एकनाथ शिंदेंना हटवलं जातंय हे लोकशाहीला शोभा देत नाही. सेनेच्या पक्षात असतानाही तुम्ही अफिडेबिट करुन घेताय. त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याचा अधिकार असतो, असे देखील दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेशी हात मिळवणी करुन घ्यावी, अशी मागणी बंडखोर आमदार करत होते. पण त्यांनी हात मिळवणी न केल्यामुळे अखेर एकनाथ शिंदे यांनी भाजप मिळून सरकार स्थापन केले आहे. तसेच आता उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यायला हवे, असे शिवसेना खासदारांना वाटत आहे,असेही म्हटले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
हकालपट्टी केल्यामुळे आढळरावांना जबर धक्का! म्हणाले, असं कसं होऊ शकतं? मी उद्धव ठाकरेंना…
पुरूषांनी फक्त ‘हे’ काम केलं पाहिजे, जेव्हा रिया चक्रवर्तीने दिला होता रिलेशनशिबद्दल सल्ला
अभिनेता राजपाल यादवने उकळली लाखो रूपयांची खंडणी! बाॅलीवूडमध्ये खळबळ