मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ५० हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. (dipak kesarkar talk about ed and their actions)
अशात ज्या आमदारांवर आणि मंत्र्यांवर ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाने कारवाई केली होती, त्यांनीच बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यास केंद्रीय यंत्रणांकडून होणाऱ्या कारवाया बंद होतील, असा त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी ही बंडखोरी केल्याचे म्हटले जात आहे.
आता या सर्व प्रश्नांवर एकनाश शिंदे यांचे समर्थक दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ईडीच्या भितीने बंड केलेले नाही. फक्त दोन चार लोकांवर ईडीने कारवाई केली आहे. बाकीचे तर शेतकरी आमदार आहे. त्यांच्यावर कसली आली ईडीची कारवाई? असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
तसेच आम्ही शिवसेनेसोबत आहोत. आमचं म्हणणं एवढंच आहे की, भाजपसोबत युती करा. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून बाहेर पडा, असं दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. दीपक केसकर यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली होती, त्यात त्यांनी म्हटले आहे.
ईडीच्या कारवाईने तुम्ही हे बंड केलंय का? असा सवाल दीपक केसकर यांना केला होता. त्यावर दीपक केसकर म्हणाले, १,२,३ आमदार ईडीच्या रडावर असतील. पण बाकीची शेतकऱ्यांची पोरं आहेत. त्यांच्यावर ईडीची कारवाई नाही. केवळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीची कमतरता झाली, त्यामुळे दरी निर्माण झाली. अशावेळी एकमेव नेता भेट देत होता, तो म्हणजे एकनाथ शिंदे. त्यामुळे त्यांच्या विषयीचं प्रेम वाढलं, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
भाजपसोबत होतो तेव्हा उद्धव ठाकरेंना सांगायचो ते फडणवीसांना सांगायचे. ती कामं पटापट व्हायची. तेव्हा ते कॉर्डिनेशन व्हायचं. उद्धव ठाकरेंची ती पत होती. आमचे आमदार त्यावेळी उद्धव ठाकरेंना सगळं सांगायचे. आता तसा संवादही राहिलेला नाही. त्यामुळे सगळ्याच आमदारांची अडचण झाली आहे, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
नशीब पुण्यात नाही, नाहीतर सोलून काढला असता; धमकी देणाऱ्या सावंतांवर पुण्यातील शिवसैनिक भडकले
याला म्हणतात कडवट! शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहीलं पत्र; केलं ‘हे’ आवाहन
आपल्या समर्थकांचा दादा भुसेंनी उघडला व्हॉट्सग्रुप, समर्थकांनी त्यांनाच घातल्या शिव्या