३ महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर, पण मैदानात पाऊल ठेवताच प्रतिस्पर्धींना घाबरवून टाकणारा रवींद्र जडेजा सध्या चर्चेत आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी २० मालिकेत ज्या प्रकारे त्याने कामगिरी केली ती खरोखरच प्रशंसनीय आहे. श्रीलंका मालिकेतील रवींद्र जडेजाला जगाने बघितले आहे आणि यावेळी त्याने सर्वांनाच हैराण केले आहे. (dinesh kartik on ravindra jadeja)
रवींद्र जडेजा, जो आधी अष्टपैलू मानला जात होता जो ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो, जो डाव्या हाताने गोलंदाजी करतो आणि जो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. पण श्रीलंका मालिकेत रवींद्र जडेजाचा नवा अवतार पाहायला मिळाला. रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रवींद्र जडेजाची परीक्षा घेतली आणि या खेळाडूने स्वतः ला सिद्ध केले आहे.
रवींद्र जडेजासाठी, श्रीलंका मालिका हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होते. जडेजा दुखापतीमुळे ३ महिने खेळला नाही पण जेव्हा तो परतला तेव्हा सगळेच थक्क झाले. जडेजाने श्रीलंका मालिकेत ३ डावात ७० धावा केल्या आणि तो एकदाही बाद झाला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मालिकेत जडेजाने वरच्या क्रमाने फलंदाजी केली आणि सर्व चाहत्यांना एक वेगळाच जड्डू पाहायला मिळाला.
रवींद्र जडेजा लखनऊ टी २० मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, तरीही त्याला फक्त ४ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. टीम इंडियाला १८४ धावांचे लक्ष्य गाठायचे होते तेव्हा जडेजाची खरी प्रतिभा दुसऱ्या टी-२० मध्ये दिसून आली. या सामन्यात जडेजा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता.
जडेजाने १८ चेंडूंत ७ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या. जडेजाची ही फलंदाजी खूप खास होती कारण या डावात त्याने एकही जोखमीचा शॉट खेळला नाही आणि सामना संपवून तो नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या टी २० मध्ये, जडेजा ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि त्याने पुन्हा एकदा १५ चेंडूत नाबाद २२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
आता क्रिकबझलशी बोलताना भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने रविंद्र जडेजाचे कौतूक केले आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर जर कोणता क्रिकेटर स्वतःमध्ये सर्वात जास्त सुधारला असेल तर तो रवींद्र जडेजा आहे. मला वाटतं जडेजाने आता आयपीएलमध्ये क्रमवारीत फलंदाजी करावी. त्याने श्रीलंका मालिकेतही आपण फलंदाज असल्याचे दाखवून दिले आहे, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे.
आता जडेजाची भीती प्रतिस्पर्धींना आहे की, तो केव्हाही क्रीझवर येऊन सामन्याचे चित्र फिरवू शकतो. गेल्या आयपीएल सिजनमध्येही त्याने आपल्या फलंदाजीच्या जोरावर चेन्नईसाठी काही सामने जिंकले होते. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याच्याशिवाय टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपमध्ये उतरणार नाही, असेही दिनेश कार्तिकने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मार्च महिन्यात मारुती करणार मोठा धमाका! लाँच करणार दोन नवीन कार, 7 सीटसह मिळणार 32Kmpl चे उत्तम मायलेज
मुलींना शिकणे झाले सोपे, खासगी शाळांमध्ये भरावी लागेल निम्मी फी, सरकारने दिल्या ‘या’ सूचना
‘कर्णधार रोहित शर्माशी हात मिळवताना जरा जपून…’, या’ माजी भारतीय खेळाडूने दिला इशारा