आयपीएल २०२२ च्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने धडक दिली आहे. त्यानंतर शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात कोण फायनलला जाणार हे ठरणार होते. पण क्वालिफायरचा सामना हरल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. (dinesh kartik is villaine of rcb)
राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७ विकेट्सनी पराभव पत्करावा लागल्यानंतर बेंगलोरचा संघ स्पर्धेतून बाहेर गेला आहे. या संघाला १५ वर्षांनंतरही पहिले विजेतेपद मिळवता आलेले नाही. आरसीबीविरुद्ध जॉस बटलरने शानदार शतक झळकावले. पण हे शतक बेंगलोरमुळेच झाले कारण त्याचाच झेल बेंगलारच्या एका खेळाडूने सोडला होता.
आरसीबीच्या एका खेळाडूने अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगी जॉस बटलरचा झेल सोडला. हा खेळाडू दुसरा कोणी नसून महान यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक होता. राजस्थानचा संघ फलंदाजी करत असताना हर्षल पटेलने ११ वे षटक टाकले होते. त्याचवेळी हा जॉस बटलरचा हा झेल गेला होता.
जॉसचा हा झेल कार्तिककडे गेला होता. पण दिनेश कार्तिकला हा एक सोपा झेल घेता आला नाही. त्यावेळी कार्तिकने बटलरचा झेल घेतला असता तर कदाचित सामन्याचा हा निर्णय झाला नसता. हा झेल चुकल्यानंतर बटलरनेही शानदार शतक झळकावले होते.
दिनेश कार्तिकने या संपूर्ण हंगामात आरसीबीसाठी चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीच्या जोरावर त्याने आरसीबीसाठी चांगली कामगिरी करत त्यांना विजय मिळवून दिले. मात्र या महत्त्वाच्या सामन्यात दिनेश कार्तिक वाईटरित्या अपयशी ठरला आहे.
राजस्थानविरुद्धच्या क्वालिफायरच्या सामन्यात कार्तिकला केवळ ७ धावा करता आल्या. या खराब कामगिरीमुळे आरसीबीची धावसंख्या कमी झाली, त्यामुळे या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा ७ गडी राखून पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ दाखवला.
विशेषतः जॉस बटलरने शानदार शतक झळकावले. या सिजनमध्ये त्याचे हे चौथे शतक ठरले. बटलरच्या जोरावर राजस्थानने फायनलचे तिकीट काढले. राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली संघाने पहिले विजेतेपद पटकावले होते.
महत्वाच्या बातम्या-
“दगडूशेठला जायचंय हे माहिती असूनही नॉनव्हेज खाल्लंच कसं? शरद पवारांची देवी-देवतांवर श्रध्दाच नाही”
७ धावा करून बाद झाला पण जाता जाता चाहत्यांचं जिंकलं मन, विराट कोहलीचा तो व्हिडिओ व्हायरल
कालिन भैया की बाबा निराला, कोण आहे ओटीटीचा बादशाह? कोण घेतं सगळ्यात जास्त मानधन?