सगळ्या सहकाऱ्यांनी घेतली निवृत्ती पण 16 वर्षांपासून T20 मध्ये मैदान गाजवतोय ‘हा’ भारतीय खेळाडू

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ९ जूनपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. 1 डिसेंबर 2006 रोजी भारताने पहिला T20 सामना खेळला होता. आतापर्यंत 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे, दिनेश कार्तिक भारताच्या पहिल्या T20 सामन्यातही संघाचा भाग होता. मात्र, त्यावेळचे इतर सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.

भारतीय संघाने 1 डिसेंबर 2006 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. वीरेंद्र सेहवाग तेव्हा टीम इंडियाचा कर्णधार होता. त्या सामन्यात सचिन तेंडुलकर, दिनेश मोंगिया, महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, इरफान पठाण, हरभजन सिंग, झहीर खान, एस श्रीशांत, अजित आगरकर आणि दिनेश कार्तिक खेळले होते. कार्तिक वगळता हे सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.

पहिल्याच सामन्यात कार्तिकने मॅच विनिंग इनिंग खेळली होती. या सामन्यात प्रथम खेळून दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात केवळ 126 धावा केल्या होत्या. भारतासाठी या सामन्यात कार्तिकने नाबाद 31 धावांची खेळी केली. टीम इंडियाच्या विजयाचा तो हिरो होता. मात्र, त्याच्याशिवाय सेहवागने 34 आणि मोंगियाने 38 धावा केल्या. त्याचवेळी धोनी शून्य, सचिन 10 आणि रैना 3* धावांवर नाबाद राहिले होते.

भारताच्या पहिल्या T20 मध्ये मॅचविनिंग इनिंग खेळणाऱ्या कार्तिकला यानंतर फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर भारताने 157 टी-20 सामने खेळले, मात्र कार्तिकला केवळ 31 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याच वेळी, कार्तिकने 2019 मध्ये शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तेव्हापासून तो सतत संघाबाहेरच आहे.

बांगलादेशविरुद्ध निदाहास ट्रॉफीमध्ये दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. वास्तविक, शेवटच्या चेंडूवर भारताला विजयासाठी पाच धावा करायच्या होत्या आणि त्यानंतर कार्तिकने षटकार ठोकून विजय मिळवला. मात्र, आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कार्तिकच्या बॅटमधून एकही अर्धशतक झळकावलेले नाही. कार्तिकने 32 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 399 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 48 आहे.

गेल्या तीन वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये धमाकेदार इनिंग खेळून पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन केले आहे. तो सध्या भारतातील सर्वोत्तम फिनिशर म्हणून उदयास आला आहे. कार्तिकने आयपीएल 2022 मध्ये 55 च्या सरासरीने आणि सुमारे 184 च्या स्ट्राइक रेटने 330 धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या
जेव्हा धावांची गरज असते तेव्हा.., कपिल देव रोहित, विराट, राहुल या स्टार फलंदाजांवर भडकले
रणबीर कपूर घालतो विग? एअरपोर्टवरच्या ‘त्या’ व्हिडीओनंतर नेटकऱ्यांना पडला प्रश्न, पहा व्हिडीओ
मेकअपशिवाय ‘अशा’ दिसतात बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री, मौनी रॉयला पाहून तर बसेल धक्का
पंकजा मुंडेंना मिळणार विधान परीषदेची आमदारकी; पुन्हा होणार राज्याच्या राजकारणात सक्रीय