शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड केल्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार आहे. (dilip walase patil on mla security)
आमदारांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक चांगलेच तापले आहे. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ राज्यभर आंदोलन करत आहे. अशात काही शिवसैनिक हे बंडखोर आमदारांवर खुपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही आमदारांचे तर ऑफिसही फोडण्यात आले आहे.
अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतले आहे, असे म्हटले जात होते. आता या सर्व प्रकरणावरुन दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढून घेण्यात आलेली नाही, असे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत. या संदर्भात ट्विटरद्वारे केले जाणारे आरोप पूर्णपणे चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले, असे ट्विट गृहमंत्र्यांच्या कार्यालयाने केले आहे.
https://twitter.com/maharashtra_hmo/status/1540574506070298625?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1540574506070298625%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fnews%2Fmaharashtra%2Fthe-security-of-any-mla-has-not-been-taken-out-the-allegations-are-false-and-misleading-clarified-home-minister-1073116
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसैनिक नाराज झालेले आहे. त्यामुळे ते आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड करताना दिसून येत आहे. त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यानुसार पोलिसांना आदेश दिले आहे.
विधानसभा सदस्य किंवा खासदार यांना सुरक्षा स्थानिक पातळीवर असते. ती सुरक्षा जिल्हा किंवा राज्यापूरतीच असते. त्यामुळे कोणाची सुरक्षा आम्ही काढली नाही, उलट त्यांना आम्ही सुरक्षा दिली आहे. पोलिस दल अलर्ट आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखावी याबाबत आम्ही आदेश दिले आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अवॉर्ड फंक्शनमध्ये सारा सलमानला असं काहीतरी म्हणाली की सलमानने रागात दिली धमकी, म्हणाला..
“शिंदे साहेब म्हणाले तुम्ही बिल भरायचे नाही, फक्त स्वत:ची काळजी घ्यायची अन् बरे व्हायचं”
VIDEO: भीषण अपघातानंतरही उभा राहून करू लागला विचित्र गोष्टी, लोकं म्हणाले, ‘भूत शिरलं आहे वाटतं’