जिकड भेळ तिकड खेळ! मी उद्धव ठाकरेंसोबत सुखी म्हणणारे आमदार गुवाहटीत दाखल, हात उंचावत शिंदे गटात सामिल

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आजचा चौथा दिवस आहे. शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. तसेच, कालपासून शिवसेनेतील आणखी काही आमदार शिंदे गटात सामील झाले आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात ४० शिवसेना आमदार असल्याची माहिती आहे.

तर आता आमदार दिलीप लांडे हेही शिंदे गटात सामिल झाले आहेत. यामुळे आता आणखीच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळीच लांडे हे गुवाहटीतील हॉटेल रेडिसन्स ब्लू येथे दाखल झाले. हात उंचावतच त्यांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर, तेथे असलेल्या आमदारांशी गळाभेट देखील झाली.

मात्र विशेष बाब म्हणजे त्यांनी याआधी आपण शिंदे गटात जाणार नसल्याच जाहीर केलं होतं. मात्र आता ते शिंदे गटात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. ”मी महाराष्ट्रातच आहे, ठाकरेंसोबत सुखी आहे, आणि त्यांच्यासोबतच राहणार” असल्याचं लांडे यांनी म्हटलं होतं.

मात्र, आज ते शिंदे गटात सामिल झाले आहेत. शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आहे. या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच शिंदे गटासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्याही वाढताना दिसून येत आहे. सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला धोका निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस आमदारांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळे नक्की पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरु आहे.

शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना चर्चेची दारे खुले ठेवण्यात आली आहे. पण एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बंडखोर सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपने आतापर्यंत या प्रकरणावर थेट भाष्य केलेलं नाही. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपचा पाठिंबा आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
एकनाथ शिंदे परत या म्हणणाऱ्या शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; वाचा नक्की काय घडलं?
‘मुख्यमंत्र्यांच्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला, राष्ट्रवादीने शिवसेना संपवली’; शिवसेना खासदार प्रतापराव जाधवांचे आरोप
जे गेलेत त्यांचा विचार करु नका, मेळावे लावा, शाखा पिंजून काढा; उद्धव ठाकरे आक्रमक
“पुन्हा एकदा गद्दारांना गाडून आपला भगवा फडकवू”; शिवसेनेचा निर्धार