हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले व्यक्तिमत्व तसेच ठाण्यामध्ये शिवसेनेचं स्थान बळकट करणारे, कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे व्यक्ती म्हणजे धर्मवीर.
दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवास सांगणारा “धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे” हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे तर मंगेश देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटात आनंद दिघेंची प्रमुख भूमिका प्रसाद ओकने साकारली आहे.
आनंद दिघे यांच्या व्यक्तीमत्वामधील एक सामान्य व्यक्ती, शिवसेना कार्यकर्ता ते ठाण्यातील शिवसेनेचा सर्वात प्रमुख नेता असा जीवन प्रवास या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील गाण्याचा लाँचिंग सोहळा मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला चित्रपटातील कलाकार मंडळी उपस्थित होती.यानिमित्ताने दिलेल्या मुलाखतीत प्रसादने धर्मवीरांची भूमिका साकारतानाचे अनुवभव सांगितले.
काय म्हणाला प्रसाद ओक?
“मी जेव्हा ही भूमिका साकारत होतो, तेव्हा तासनतास व्हॅनिटी व्हॅनमध्ये त्यांचा फोटो बघत बसायचो. कारण त्या माणसाच्या डोळ्यात एक वेगळीच गंमत होती आणि एक अभिनेता म्हणून त्यांचे डोळे तशाच प्रकारे साकारणं ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी होती”, असे प्रसाद म्हणाला.
“मी अनेक तास त्यांच्या फोटोकडे टक लावून बघायचो. कोण जाणे? काय माहिती, पण ते सतत माझ्या आसपास असायचे आणि नकळत ते माझ्यात यायचे”, असेही त्याने म्हटले आहे. येत्या १३ मे रोजी ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
दहावी पास महिला शेतकऱ्याने एका एकरात कमविले 14 लाख; वाचा यशस्वी यशोगाथा
‘बाब्या खातो दहा लाडू पण त्याला देणार कोण?’ अशी परिस्थिती सध्या मराठी सिनेसृष्टीची – चिन्मय मांडलेकर
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर; आईला झालाय कॅन्सर, सोशल मिडीयावर दिली माहिती
मातोश्रीवर बाळासाहेब आनंद दिघेंची गुरूपोर्णिमा! ‘धर्मवीर’चे गाणे तुफान हिट; २० तासांत २० लाख व्ह्यूज