बुधवारी जम्मू-काश्मीर येथील बारामुल्ला या जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या सैन्याने जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. जम्मू काश्मीर मध्ये असलेल्या बारामुल्ला जिल्हयातील क्रेरी परिसरातील जाजीभटमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक झाली आणि यामध्ये भारतीय सैन्यातील एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.
शाहिद झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या वडिलांचा एक व्हिडिओ जम्मू काश्मीर पोलिसांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की, माझ्या मुलाच्या बलिदानामुळे एक हजार नागरिकांचे प्राण वाचले. तो शहीद झाला असून तो आता कधीच परत येणार नाही.
परंतु, मला त्याचा अभिमान आहे. दहशतवाद्यांसोबत दोन हात करताना त्याने आपला जीव दिला. त्यामुळे माझ्यासह संपूर्ण समाजाला त्याचा अभिमान आहे. लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदशी संबंधित 26 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी जानेवारीपासून ठार केलेले आहे.
तसेच त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न मोडून सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कुपवाडा जिल्ह्यात कंठस्नान घातलेले आहे. तसेच यावेळी काश्मीर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलेले आहे की, सुरक्षा दलांकडून ठार करण्यात आलेल्या 26 दहशतवाद्यांपैकी 14 दहशतवादी जैश ए- संघटनेशी संबंधित होते.
त्यातील 12 जण लष्कर ए-तैयबाशी संबंधित होते.याचसोबत जम्मू-काश्मीरमधील बंदीपुरा येथे 13 मे रोजी देखील चकमक झाली होती. यामध्ये या चकमकीत लष्कर- ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. ठार करण्यात आलेले हे दोन्हीही दशहतवादी काश्मीरी पंडीत राहुल भट्ट यांच्या हत्तेत सहभागी होते.
https://twitter.com/india_narrative/status/1529731195587919873?s=20&t=kDKFlCuDTw-w1XftvHN4Lw
महत्वाच्या बातम्या
रुपाली पाटलांची चंद्रकांत पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, केली मुंडकं छाटण्याची भाषा, म्हणाल्या..
कोहली महान खेळाडू, लोक त्याला विनाकारण ट्रोल करतात; पाकिस्तानी खेळाडूचा कोहलीला जाहीर पाठिंबा
भाजपचा नवा फॉर्म्युला, ७० वर्षांवरील उमेदवारांना तिकीट नाही; ‘या’ बड्या नेत्यांचा पत्ता कटणार
मंचावर मोदींसमोरच एमके स्टॅलिन यांनी भाजपवर केले गंभीर आरोप, भाजपने ‘असे’ दिले प्रत्युत्तर