प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांनी बॉलिवूड विश्वात आपल्या अभिनयाने एक खास स्थान मिळवले आहे. ७० आणि ८० च्या दशकात धर्मेंद्र यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते. सर्वांचे लाडके स्टार धर्मेंद्र आता वृद्ध झाले असून ते चित्रपटसृष्टीपासून लांब आहेत. पण धर्मेंद्र यांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही.
धर्मेंद्र यांनी चित्रपट प्रवासात खूप यश मिळवले आणि ते त्यांच्या कौटुंबिक जीवनातही खूप यशस्वी जीवन जगत आहेत. अभिनेता धर्मेंद्र यांची दोन्ही मुले सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही बॉलिवूडमध्ये एक खास स्थान निर्माण केले आहे. धर्मेंद्र यांचा मोठा मुलगा सनी देओल याने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूड चित्रपट विश्वात खूप नाव कमावले आहे.
धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते आता ८६ वर्षांचे झाले आहे. ते अशा टप्प्यावर आले आहेत की आता वाढत्या वयामुळे आणि वृद्धत्वामुळे ते कोणालाही दिसून येत नाहीये. धर्मेंद्र खूपच अशक्त झाले आहेत आणि धर्मेंद्रचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
धर्मेंद्र यांचे फोटो पाहून चाहते खूप भावूक झाले आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कारण ते सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ते अनेकदा चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांचे अनेक फॅन पेजही आहेत.
सध्या सोशल मीडियावर धर्मेंद्रचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. धर्मेंद्रचे काही नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये धर्मेंद्र पूर्वीपेक्षा अशक्त दिसत आहे. वाढत्या वयामुळे धर्मेंद्र यांना चालायलाही त्रास होत आहे.
धर्मेंद्रचे फोटो बघून चाहते खूप भावूक झाले आणि सोशल मीडिया यूजर्सनी त्यांच्या या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या. हे फोटो सध्या चर्चेचा विषय बनले आहे. धर्मेंद्र भिंतीचा आधार घेऊन उभे असल्याचे दिसत आहे. त्यांच्या शेजारी उभा असलेला एक व्यक्ती त्यांना आधार देताना दिसत आहे. धर्मेंद्रचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटो त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी जात असतानाचे आहेत.
महत्वाच्या बातम्या-
आमीर खानच्या प्रेमात वेडी झाली ‘ही’ अभिनेत्री; इतक्या वर्षानंतर स्वत:च केला खुलासा
सावधान! आता whatsapp वर फेक न्युज पसरवणाऱ्यांवर होणार ‘ही’ कारवाई
पंतप्रधान मोदींना शिव्या देणाऱ्याला भाजप कार्यकर्त्यांनी चाटायला लावली थुंकी, व्हिडीओ व्हायरल