लोकनेते म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे यांच्या जीवन प्रवासावर धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे असा चित्रपट आला आहे. सध्या हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटामुळे आनंद दिघे किती प्रसिद्ध होते आणि त्यांनी लोकांसाठी किती कामे केली आहे हेही समोर आले आहे. (dharmaveer 10 days box office collection)
१३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सध्या बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट खुप धूमाकूळ घालत आहे. हा चित्रपट प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शित केला आहे. तर प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओकने या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका निभावली आहे.
हा चित्रपट ४०० हून अधिक स्क्रीनवर झळकत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने हाऊसफुल्लचे बोर्ड लावले होते. तसेच याचवेळी हिंदी चित्रपटसृष्टीचे चित्रपटही रिलीज झाले होते. पण त्यांचा धर्मवीरच्या कमाईवर काहीच परीणाम झाला नाही. अगदी पहिल्या दिवसापासून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे.
४०० पेक्षा जास्त स्क्रीन आणि १० हजारांपेक्षा जास्त शो सह हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवतोय. धर्मवीर चित्रपटाच्या कमाईचे आकडेही सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारे आहे. धर्मवीरने पहिल्याच आठवड्यात १३.८७ कोटींची कमाई केली होती. असे असताना आता आणखी एक मोठा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
धर्मवीर चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत १८.०३ कोटींची कमाई करत एक नवीन विक्रम बनवला आहे. धर्मवीरचा हा आकडा खरंच हैराण कऱणारा आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच मराठी प्रेक्षकही हिंदी चित्रपटांकडे वळत होते. पण आता धर्मवीरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २.५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर तीन दिवसांत त्याने ९.५९ कोटींची, एका आठवड्यात १३ कोटींची तर आता फक्त १० दिवसांत तब्बल १८ कोटींचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पंढरपुरचे विठ्ठल मंदिर हे पुर्वीचे बौद्ध विहार, ते बौद्ध लोकांना हस्तांतरित करा; डॉ. आगलावेंची मागणी
राज ठाकरेंना विरोध करणारे बृजभूषण मुंबईत येऊन सभा घेणार? मग मनसे काय भूमिका घेणार?
उमरानचा घातक चेंडू लागला मयंकच्या बरगडीत, जबर जखमी झाल्याने जागेवरच लागला रडू; पहा व्हिडीओ