असे म्हणतात प्रत्येकाच्याच आयुष्यात दु:ख, संकटे, अडचणी असतात. पण त्या संकटांना तोंड देऊन पुढे जाणारा व्यक्तीच हा आपल्या आयुष्यात पुढे जात असतो. आजची गोष्टही अशाच एका तरुणाची आहे, ज्याला लहानपणापासूनच अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं पण तो कधी त्यांच्यासमोर झुकला नाही. (dhananjay rade success story)
मूळ जळगावच्या भादली येथील रहिवासी असलेल्या त्या तरुणाचे नाव धनंजय रडे असे आहे. त्याला एक बहिणही आहे, जिचे नाव मोनिका असे आहे. लहानपणी त्याच्यासोबत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली होती, ज्यामुळे तो त्याच्या आयुष्यात वाईट मार्गाही लागला असता, पण त्याला त्याच्या आयुष्यात चांगला माणूस व्हायचे होते म्हणून तो कधीही वाईट गोष्टीच्या नादी लागला नाही.
धनंजय हा लहान असतानाच त्याच्या वडिलांनी त्याच्या आईच्या डोक्यात मुसळी घालून खुन केला होता. त्यावेळी धनंजय आणि मोनिका हे दोघेही घरातच होते. त्यावेळी त्यांचा बाप त्या दोघांनाही संपवायला निघाला होता. पण ते स्वत:चा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेले.
अनाथ झालेले दोघे आईच्या अंत्यविधीलाही येऊ शकले नाही. दहा दिवसानंतर पोलिसांनी दोन्ही भावंडांना गावात आणले होते. त्यानंतर शासनाने त्याला मदत केली. त्या दोघांनीही स्वत:च्या वेदनांवर स्वत:च फुंकर घातली आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली. इतकंच नाही, तर त्याचे आयुष्यातील आव्हानांना तोंड देऊन तो जिंकलाही.
भादली येथे राहणारा घनश्याम हिरामण रडे (धनंजयचे वडिल) याने पत्नी आशाबाईचा खुन केला होता. हा क्रुर बाप मुलांच्याही जीवावर उठला होता, पण त्या दोघांनी तिथून पळ काढला आणि त्यानंतर ग्रामस्थांनी मुलांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या दिवसापासून घनश्याम फरार आहे.
त्यावेळी आशाबाईचा अंत्यविधी मुलांविनाच आवरावा लागला होता. तेव्हा धनंजय नऊ तर मोनिका आठ वर्षांची होती. दहा दिवसानंतर दोघांनाही गावात आणलं. त्यांना आईच्या दशक्रियाविधीत सहभागी केलं. तेथून धनंजयला पोलिसांनी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अनुरक्षण संघटनेच्या बालगृहात सोडले.
तेव्हा मोनिकाला दुसरीच्या तर धनंजयला चौथीच्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी घातलं. बघता बघता धनंजय १० वी उत्तीर्ण झाला इतकेच नाही, तर त्याला १० वीला ७० टक्के मिळाले. पुढे धनंजयने मुंबईच्या विद्याविहार आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. तिथेही तो वेल्डर शाखेत पहिला आला, मोनिकाही तोपर्यंत सज्ञान होऊन भादलीला परतली होती.
धनंजय आता सुट्टीच्या दिवशी आजी आणि बहिणीला भेटायला जातो. आता पुढच्या वर्षी धनंजयची बहिण मोनिकाचे लग्न आहे. त्यांना आयुष्याने आतापर्यंत अनेक गोष्टी शिकवल्या. बालगृहाने त्यांना जगणं शिकवलं. इथपर्यंत आणलं. धनंजय आणि मोनिका हे अतिशय प्रामाणिक आहे, त्यामुळे गावातील लोकांना नेहमीच त्यांचे कौतूक असते.
महत्वाच्या बातम्या-
कोल्हापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; शिवसेनेचे राजेश क्षीरसागर झाले ‘नॉट रिचेबल’
तीन कोब्रांना एकाचवेळी हाताळत होता तरुण अन्…; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
भयानक! हँडसम दिसण्यामुळे तरुणाचा गेला जीव, ८०० किलोमीटवरुन बाईकवरुन आला आरोपी अन् घेतला जीव