राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी अचानक धरणे आंदोलन केले. यावेळी एसटी कामगारांनी सिल्व्हर ओकच्या परिसराची तोडफोड करून आंदोलन सुरू केले. इतकेच नाही, तर निवासस्थानाला चप्पलाही फेकून मारल्या. (dhananjay munde on st workers)
शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलिसांनाही धक्का बसला. शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन होत असल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही घराबाहेर पोहचले होते.
या घटनेमुळे राजकीत वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. आता याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आजपर्यंत शरद पवार हे कर्मचाऱ्यांच्याच बाजूने लढाईत उतरले आहे. आंदोलकांनी घरापर्यंत येऊन दगड फेकून किंवा चप्पल फेकून मार्ग निघणार नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
न्यायालयानं यासंदर्भात निर्णय दिला आहे. त्याचं स्वागत केलं, पेढे वाटले. पण काही जण हे आंदोलन पेटत राहावं यासाठी प्रयत्न करत आहे.आजपर्यंत शरद पवार कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढाईत उतरले आहे. आजपर्यंत कोणतंही आंदोलन सत्ताधारी पक्षाच्या किंवा विरोधी पक्षाच्या नेत्याच्या घरापर्यंत गेलं नाही, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
तसेच या सरकारनं जेवढे एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहे, तेवढे निर्णय कोणी घेतले नाही. यानंतरही आंदोलकांनी घरापर्यंत जाऊन, दगड फेकून, चप्पल फेकून मार्ग निघणार नाही. उद्या कोणीही कोणाच्या घरावर जाईल. आमच्या मागण्या मान्य करा, दगड फेकू चप्पल फेकू असं होईल, हे दुर्देवी आहे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
शरद पवारांनी अनेक वर्ष कर्मचाऱ्यांच्या बाजूनं हयात घातली. त्यांच्याच घरावर हे आंदोलन झालं. यात कुठेतरी संशयही निर्माण होतोय, हे समोर येणं गरजेचं आहे. हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम आहे, असं वाटलं, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
माझी हत्या होऊ शकते; पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर सदावर्तेंचं खळबळजनक विधान
एका बाऊन्सरमुळे फुटले होते ‘या’ भारतीय फलंदाजाचे डोके, ६० वर्षांनंतर डॉक्टरांनी डोक्यातून काढली मेटल प्लेट
राज ठाकरेंना आशेचा किरण समजत होतो, पण…; पुण्याच्या मनसे उपाध्यक्षांचा राजीनामा