राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली होती. एका महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे पाच कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्या महिलेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (dhananjay munde on renu sharma arrest)
धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी मलबार हिल पोलिस ठाण्यात त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेला सोपवण्यात आले होते. आता याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. संबंधित महिलेला मुंबईच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. रेणू शर्मा असे तिचे नाव आहे.
आता याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दीड-दोन वर्षांपासून हा त्रास मला दिला जात आहे. आधी जानेवारीमध्ये त्या महिलेने माझ्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी ती मागे घेतली. गेल्या दिड वर्षांपासून मी हा त्रास सहन करतोय, पण आता मी पुढचं पाऊल उचलणार, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
ती महिला मला जो त्रास देत होती, तो त्रास मला सहन होत नव्हता. त्यामुळे त्या महिलेविरोधात मी तक्रार दाखल केली आहे. तसेच त्या महिलेविरोधात माझ्याकडे पुरावे देखील आहे. त्यानंतर पोलिसांनी तिच्यावर कारवाई करत तिला ताब्यात घेतलं आहे. तसेच हे सर्व प्रकरण सहनशीलतेच्या पलीकडे आहे. त्यामुळे मी पुढचं पाऊल उचलणार, असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
रेणू शर्मा हिनेच मागील वर्षी जानेवारी महिन्यात धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचे आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसातच महिलेने ती तक्रार मागे घेतली होती. तेव्हापासूनच ती परदेशातील नंबरवरुन मला मेसेज, फोन करत होती आणि पैसे मागत बदनामी करण्याची धमकी देत होती, असे धनंजय मुंडे यांनी तक्रारीत म्हटले होते.
दरम्यान, रेणू शर्मा ही मूळ मध्य प्रदेशच्या इंदोरची असून ती करुणा शर्माची बहिण आहे. धनंजय मुंडे यांनी तिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने आणि इंदोर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला अटक केले आहे. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आले आहे. आता मुंबई पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.
महत्वाच्या बातम्या-
प्रचंड गदारोळानंतरही मिटकरींचा माफी मागण्यास नकार; उलट म्हणाले, मी कशाला माफी मागू?
गर्लफ्रेंड अथियाला पाहिल्यानंतर केएल राहुलला नीट बॅटिंग जमत नाही, खराब फॉर्ममुळे नेटकरी संतापले
विवेक अग्निहोत्रींवर ‘या’ कारणामुळे भडकले शीख लोकं, म्हणाले, ‘द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करू नका’