Share

मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईतील ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि काँग्रेस नेते धनंजय मुंडे यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

धनंजय मुंडे यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या दक्षतेखाली उपचार सुरू आहेत. संध्याकाळच्या सुमारास धनंजय मुंडे यांना अस्वस्थ जाणवू लागलं. त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

त्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन मुंडे यांची भेट घेतली आणि विचारपूस केली. टोपेंनी त्यांच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधून त्यांची विचारपूस केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ANI ने यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. सध्या धनंजय मुंडेंना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

ते प्रवास करून थकले होते. त्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यातच ते चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडेंना किरकोळ त्रास जाणवत होता. सकाळपासूनच धनंजय मुंडे यांना बरं वाटत नव्हतं. शेवटी संध्याकाळी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.

त्यांना स्ट्रोक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान, धनंजय मुंडे सायंकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्वर ओकवर होते. साधारण साडेसहापर्यंत ते तिथेच होते. त्यानंतर साधारण ७ वाजताच्या सुमारास त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. याबाबत रुग्णालयात प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

डॉक्टरांनी सगळ्या आवश्यक तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. त्यांची प्रकृत्ती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांचे समर्थक आणि अनेक नेत्यांनी त्यांची प्रकृती लवकर ठीक व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे. अनेक नेत्यांनी सोशल मिडीयावरून पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या
‘या’ खेळाडूने राजस्थानला दिला धोका, नेट प्रॅक्टीस करताना घेतला संन्यास, चाहते झाले हैराण
गुणरत्न सदावर्तेंचा पाय आणखी खोलात; मुंबई, साताऱ्यानंतर आता कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल
राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली डेडलाईन; ‘या’ तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा…
कार घ्यायला पैसै नव्हते म्हणून राखी झाली होती उदास, ‘या’ व्यक्तीने गिफ्ट केली नवीकोरी BMW

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now