Share

‘त्यांचं ते थम्प्स अप कधीच विसरणार नाही’, जगतापांची एकनिष्ठता पाहून फडणवीस झाले भावूक

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या मतदान सुरू आहे. अनेक जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यादरम्यान, पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पुण्यातील कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक दोघेही मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेतून विधानभवनात दाखल झाले होते.

दोघांची निष्ठा पाहून देवेंद्र फडणवीस भावूक झाले. फडणवीसांनी याबाबत ट्विटरवर एक पोस्टही केली आहे. यामध्ये त्यांनी जगताप आणि टिळक या विधान भवनात आल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

फडणवीस म्हणाले की, दोघांचीही पक्षाशी असलेली कटिबद्धता पाहून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला शब्द सुचत नाहीयेत. गंभीर आजार असतानाही त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला, असं म्हणत फडणवीसांनी त्यांचं कौतुक केलं आहे.

पुढे फडणवीस म्हणाले की, दोघांना विधानभवनात पाहिल्यानंतर त्यांचा उत्साह भाजपच्या इतर कार्यक्रमांप्रमाणेच होता. त्यांचे ते थम्स अप आम्ही कधीही विसरणार नाही. सध्या त्यांचे हे व्हिडीओ खुप व्हायरल होत आहेत. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराशी झुंज देत आहेत.

अमेरिकेहून मागवलेल्या इंजेक्शननंतर त्यांच्या प्रकृतीत बरिचशी सुधारणा झालेली पाहायला मिळाली. ५० दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ते आयसीयुमध्ये होते. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. त्याचवेळी राज्यात राज्यसभेची निवडणुक सुरू होती.

जगताप हे भाजपकडून निवडून आले. आमदार जगताप हे सकाळीच मतदान करण्यासाठी आले होते. त्यांना कार्डियाक रुग्णवाहिकेतून आणण्यात आलं होतं. साधारण १२.३० च्या सुमारास ते विधान भवनाच्या परिसरात दाखल झाले होते. त्यानंतर स्वत: देवेंद्र फडणवीस त्यांना घेण्यासाठी गेले होते.

रुग्णवाहिकेतून उतरल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख सीएम साहेब म्हणून असा केला. दरम्यान, काही क्षणातच निवडणुकीचे निकाल हाती लागतील. दोन्ही पक्षांकडून आमदार फोडाफोडीचे प्रयत्न झाले होते. आता निकाल काय लागतोय याकडे सर्वांचे लक्ष आहे. काही उमेदवारांचा विजय निश्चित आहे असं बोलले जात आहे.

https://twitter.com/iLaxmanJagtap/status/1535251417803685888?s=20&t=zhgLXLTyDD-Irig5XW4UrA

महत्वाच्या बातम्या
पुरूषाने बॉडी दाखवली की कोणी काही नाही म्हणत पण बाईने दाखवली तर.., ईशा गुप्ताचे मोठे वक्तव्य
५९ पैशांचा शेअर २२०० रुपयांवर, १ लाखाचे झाले ३७ कोटी, तुमच्याकडे आहे का ‘हा’ शेअर?
Crorepati Tips: आजच चहा पिणे सोडून द्या, ‘असे’ व्हा करोडपती, मग करा मज्जाच मज्जा!
IND vs SA: तिकीटासाठी दोन महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंज्या, व्हिडीओ तुफान व्हायरल

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now