शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या बालेकिल्ल्यात संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक प्रकारे टोला लगावत डिवचले आहे. “शिवसेना वाढवायची असेल, तर नागपुरात पाय घट्ट रोवले पाहिजेत नागपूर उपराजधानी आहे, हिंदुत्वाचा गड आहे आणि एकेकाळी शिवसेनेची ताकद येथे चांगली होती.
आमच्यासारखे नेते येतात तेव्हा लोक जमतात, अनेक मान्यवर येतात. या सर्वांना पक्षासोबत काम करण्याची इच्छा आहे. त्याला कसा आकार द्यायचा हे पाहू, अशा प्रकारचे विधान संजय राऊत यांनी केले आणि फडणवीसांना टोला लगावला.
या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता “नागपूरच्या मातीमध्ये एक वेगळेपण आहे. ते नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल”, या शब्दात त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत जोरदार टोला लगावला.
महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन संजय राऊत नागपूरमध्ये दौरा करत असेल तरी नागपूरच्या मातीत आपले पाय घट्ट रोवले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिले. याच बरोबर पोलिस दलातील उच्च अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदलीचे आदेश आणि त्यांना लगेच दिलेली स्थगिती यावरून देखील फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
काल राज्यातील अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. मात्र आदेश जारी होण्याच्या अवघ्या १२ तासांत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या आहेत. आदेश परत घेण्यामागे नेमकं काय कारण आहे की प्रशासकीय चूक आहे? याचा खुलासा झाला पाहिजे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, याआधी सुद्धा दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्या होत्या. नंतर ते बदली घोटाळा चौकशीच्या फेऱ्यात आहेत. असे विधान करत राज्यसरकारच्या कामाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी शंका उपस्थित केली.
महत्वाच्या बातम्या
हे सर्व सहनशीलतेच्या पलिकडे, आता मी पुढचं पाऊल उचलणार; रेणू शर्माच्या अटकेनंतर मुंडे कडाडले
उल्टी आल्यामुळे मुलाने खिडकीतून डोकं बाहेर काढलं आणि चालकाने वळवली स्कूल बस, वाचून काळीज फाटेल
शुभमन गिलनंतर ‘या’ क्रिकेटपटूसोबत जोडलं जातंय सारा तेंडुलकरचं नाव, ‘तो’ फोटो झाला व्हायरल
प्रचंड गदारोळानंतरही मिटकरींचा माफी मागण्यास नकार; उलट म्हणाले, मी कशाला माफी मागू?