Share

सत्तेचा इतका माज? इतकी दंडुकेशाही?, राणा दाम्पत्याच्या अटकेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

devendra fadnvis and thakare

सध्या राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेले आहे. राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले आहे. प्रवीण दरेकर यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

सध्या देवेंद्र फडणवीसांनी केलेली फेसबूक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रातील घटना व्यथित करणाऱ्या आहेत. भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले- आरोपी अटकेत नाहीत. मोहित भारतीय यांच्यावर हल्ला- साधा गुन्हा दाखल नाही. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा- साधी दखलसुद्धा नाही.

हनुमान चालीसा पठनाला राणा दाम्पत्य येतात- थेट अटक. इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मदुर्मकी? सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण जनता सारे काही पाहत आहे, निव्वळ लज्जास्पद. लोकशाहीचे मत मांडण्याचा अधिकार संपला?

पुढे ते म्हणाले की, लोकशाहीचे गाऱ्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का? असे प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दरम्यान, आक्रमक शिवसैनिकांसमोर राणा दाम्पत्यांनी आपला प्रण मागे घेतला. पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात विघ्न नको, असे म्हणत आमदार रवी राणा यांनी माघार घेतली होती.

यानंतर राज्य सरकारने राणा दाम्पत्यांना अमरावतीला पोहचवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली होती. पण आता राणा दाम्पत्याला अटक झाली आहे. खार पोलिसांनी कारवाई करत राणा दाम्पत्याला अटक केली आहे. या अटकेनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? या चर्चेला उधाण आले आहे.

प्रवीण दरेकर यांनी मोठे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. राणा दाम्पत्याला अटक झाल्यानंतर प्रवीण दरेकर म्हणाले की, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊतांनी भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे खुल्ले आव्हान देत वातावरण तापवले आहे.

https://www.facebook.com/239595939526679/posts/2353389841480601/?d=n

महत्वाच्या बातम्या
राणा दाम्पत्याला अटक झाल्यावर फडणवीस संतापले, म्हणाले, सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण..
राणा दाम्पत्याला घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, वळसे पाटलांवर दिली जबाबदारी
‘चला घराच्या बाहेर निघा’ संतापलेल्या नवनीत राणा थेट पोलिसांनाच धमकावू लागल्या; पहा व्हिडिओ
नो बॉल वाद: संजू सॅमसनने ऋषभ पंतला ठरवलं खोटं, ठामपणे म्हणाला, फुलटॉस बॉल होता आणि..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now