Share

“बाबरी पाडताना देवेंद्र फडणवीस तेथे हजर होते, याला मी साक्षीदार आहे”

मध्यंतरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “बाबरी पाडायला मी गेलो होतो” असा जाहीर दावा केला होता. परंतु यानंतर देवेंद्र फडणवीस खोटे बोलत असल्याचा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लावला होता. या पार्श्वभूमीवर आता भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांनी देवेंद्र फडणवीसांच्या दाव्याचे समर्थन केले आहे.

नीता केळकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे, “बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला गेला त्यावेळी सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही तेथे हजर होते. मी त्याची साक्षी आहे, माझ्यासोबत अनेक सांगलीकर कारसेवक त्याचे साक्षी आहेत” असे सांगितले आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे.

त्यांनी म्हणले आहे की, “बाबरी ढाचा पडताना देशातून आबाल वृद्ध आयोध्या नगरीत आले होते. तीस वर्षापूर्वी लाखो कारसेवक ‘रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनायेंगे’चा नारा देत शरयू नदीकाठी जमले होते. सतरा, अठरा वर्षाच्या कोठारी बंधूंचे बलिदान जयंतरावांना आठवत नसेल.

तसेच, “त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या करिअरची चिंता केली असती तर त्यांना कारसेवेला पाठवले नसते” असा टोला त्यांनी लगावला आहे. पुढे बोलताना, “आमची अस्मिता ज्यांना आठवत नाही ते बाबराचे वंशज असावेत. धर्माभिमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला शिकवला. जगात कर्तृत्ववान आणि खंबीर कणखर पंतप्रधान बनले. महागाई व गरिबीवर राज्यातील मंत्र्यांनी बोलू नये” असेही त्यांनी बोलून दाखवले आहे.

यासोबतच, “मुख्यमंत्र्यांना सांगूनही अजून पेट्रोल व डिझेलवरचे कर कमी केले नाहीत. मंत्री तुरुंगात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राज्य अंधकारात आहे. यावर जयंतरावांनी फडणवीस यांच्याशी गप्पा माराव्यात. तुमच्या सरकारचा तिहेरी ढाचा देवेंद्र फडणवीस यांच्या हातूनच पडणार” अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान राज्यात सुरु असलेल्या हिंदुत्वाच्या वादात “मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली. बाबरी ही मशीद नव्हती परंतु परकीय आक्रमणाचा तो ढाचा होता, तो पाडला त्यावेळी मी स्वत: तेथे होतो,” असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या
अवघ्या २२ व्या वर्षी हजारो कोटींची कंपनी उभी केली; पुण्याची आर्या तावरे झळकली फोर्ब्जच्या यादीत
राष्ट्रवादीच्या महीला प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ महीला नेत्याची निवड; चर्चेतील नावांपेक्षा वेगळ्या नेत्याला संधी
पुण्याचा २२ वर्षीय आर्या तावरेचा डंका; फोर्ब्जच्या यादीत झळकले नाव; वाचा काय कामगिरी केलीय…
ज्या मुलासाठी आर. माधवनने देश सोडला, तोच आता म्हणतोय, मला त्यांचा मुलगा म्हणून रहायचं नव्हतं..

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now