शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या आज पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. या घटनेवरून आता भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे.
भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर तिखट शब्दात निशाणा साधला आहे. “राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? आरोपांना उत्तर देऊ शकत नाही म्हणून थेट गुंडागर्दीवर उतरायचे? असा सवाल फडणवीस यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1489944277299826690?s=20&t=XVFzL-4i3S6pklHNORXqNQ
पुढे फडणवीस म्हणतात, ‘आम्ही कायदा पाळतो. पण याचा अर्थ गुंडागर्दी खपवून घेणार नाही. महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध,” असं देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खडेबोल सुनावले आहे.
तर जाणून घेऊया नक्की प्रकरण काय.. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात निघालेल्या सोमय्या यांची गाडी शिवसैनिकांनी अडवली. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या भ्रष्टाचाराची तक्रार देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गेले होते.
त्यानंतर ते महापालिकेमध्ये आले असताना काही शिवसैनिकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच सोमय्या यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्नही झाला. सोमय्या पालिका कार्यालयात आले तेव्हा त्यांच्यात आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठा संघर्ष बघायला मिळाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलन केलं. सोमय्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला.
शिवसैनिकांकडून प्रचंड घोषणाबाजी झाली. यावेळी धक्काबुक्की देखील झाली. शिवसैनिकांनी केलेल्या धक्काबुक्कीत भाजपा नेते किरीट सोमय्या अक्षरशः पायरीवर पडलेले पाहायला मिळाले. त्यामुळे सोमय्या यांना त्या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला. पण यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांचा प्रचंड रोष पाहायला मिळाला.
तसेच शिवसैनिकांनी शर्ट काढून त्यांच्या गाडीवर हल्ला केला. अनेक कार्यकर्ते त्यांच्या गाडीसमोर अक्षरश: झोपले. यावेळी सोमय्या यांनी परिस्थितीचा अंदाज घेत ते देखील लवकर गाडीत शिरले. विशेष म्हणजे सुरक्षा रक्षकांनी त्यांची कामगिरी चोखपणे बजावली. आता या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत.
https://twitter.com/Krunal_Goda/status/1489937362805489666?s=20&t=1TztVSH_m9iuN0eGD96svQ
दरम्यान, सोमय्या यांनी स्वतः याची माहिती देत ट्वीट केलंय. ते म्हणाले, “माझ्यावर शिवसेनेच्या गुंडांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात हल्ला केला आहे.” तसेच सोमय्या या हल्ल्यानंतर संचिती हॉस्पिटलला दाखल झालेत. या ठिकाणी त्यांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ओवेसींच्या गोळीबारावर पत्नीला विश्वास नाही; म्हणाली, डिनर डेटना न्यायचं नाही असं सांगा, खोटं का बोलताय
जेलमध्ये टाकलं तरी मस्ती गेली नाही, सुटकेनंतर थेरगाव क्वीनचा मित्रांसोबत पुन्हा धिंगाना; व्हिडिओ व्हायरल
अश्लील व्हिडिओ पाहून लहान मुलांचे भयानक कृत्य; ७ वर्षांच्या बहिणीवरच केला सामूहिक बलात्कार
१९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मोस्ट वॉन्टेड आरोपी अबू बकरला अटक