राज्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजप – शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप आय प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे.
यासाठी आता निमित्त झाले एमआयएमनं आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीसोबत हातमिळवणी करण्याची दिलेली ऑफर. तसेच शिवसेनेने हिंदुत्व सोडलं, असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. यावर रविवार खुद्द मुख्यमंत्री ठाकरेंनी भाष्य केले.
‘भाजपाचे हिंदुत्व राजकारणासाठी आहे. आपले हिंदुत्व हे देशाच्या हिताचे आहे. उत्तर प्रदेशात भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. याकडे दुर्लक्ष करू नका. विरोधकांच्या कुरापती ओळखायला शिका. विरोधकांचा डाव हाणून पाडा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला तिखट शब्दात लक्ष केले. ‘आपल्या बुडाखाली संपूर्ण देश असला पाहिजे या अट्टहासाने ते चालले आहेत. ही एका घातक हुकूमशाहीची नांदी आहे, अशी सणसणीत टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे.
यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत शाब्दिक हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली. इतिहास ठावूक नसलेले आम्हाला काय शिकवणार?, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी हा एमआयएमचा कट असल्याचं सांगत तो उधळून लावण्याचं आवाहन केलं आहे. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, विरोधक काय खुरापती करत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विरोधक विरोध करत राहणार पण आता तितक्याच ताकदीनं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे असेही ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
तब्बल ८०० कोटींच्या बँक घोटाळ्याचा पर्दाफाश, बँकेच्या माजी अध्यक्षांसह २० जणांवर गुन्हा दाखल
काश्मिरी पंडितांचं दुःख दाखवलं आता मुस्लिमांच्या हत्येवरही चित्रपट बनवा, IAS अधिकाऱ्याची मागणी
‘जनाब देवेंद्र फडणवीसजी चादर चढवताना तुमचा स्वाभिमान वाकला/ झुकला नाही का?’
धनंजय मुंडे आणि माझ्यावर चित्रपट निघाला तर सर्वांना कळेल की.., करुणा शर्मांच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड