शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिलं आहे. नायडू यांना लिहिलेल्या पत्रात राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, संजय राऊत यांच्या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
तसेच राऊत यांनी या पत्रानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजन आरोप केले. राऊतांनी मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचं म्हणत आम्ही घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल असं म्हणत फडणवीसांना आव्हान दिलं. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
ते याबाबत गोव्यात पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते. “सिंह कधीही गिधाडांच्या धमकीला घाबरत नाही. ईडी काय करते, का करते हे ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत फडणवीस यांनी राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
“संजय राऊत हे सध्या व्हिक्टिम कार्ड खेळत आहेत. रोज सकाळी येऊन ते मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधानं केली पाहिजेत हे त्यांना चांगलं माहित आहे. त्यांना जे काही मांडायचं असेल ते त्यांना कोर्टात मांडावं”, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, राऊत यांनी या पत्रानंतर दिल्लीत पत्रकार परिषद घेत अनेक खळबळजनक आरोप केले. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचं काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही. याद राखा, मुंबईत शिवसेनाच दादा आहे. आम्हीच मुंबईत दादागिरी करणार आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, ‘२९ नोव्हेंबर २०२१ रोजी माझ्या मुलीचे लग्न झाले होते. त्यानंतर ईडी आणि अन्य तपास यंत्रणांकडून लग्नासाठी सेवा पुरवणाऱ्या डेकोरेटर्स आणि इतर व्यावसायिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांकडून या सगळ्यांना धमकावले आणि घाबरवले जात आहे.’
संजय राऊत यांनी तुम्हाला लग्नाच्यावेळी ५० लाख रुपये रोख दिले, असा जबाब देण्यासाठी संबंधित व्यावसायिकांवर दबाव आणला जात आहे. खोटी कबुली देण्यास नकार दिल्यामुळे ईडी आणि अन्य यंत्रणांच्या अधिकाऱ्यांकडून या सर्वांना सातत्याने त्रास दिला जात असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाला, डेकोरेशनवाल्यांना ईडीवाल्यांन उचलून आणलं. हे त्यांचं काम आहे का? किती पैसे मिळाले विचारलं असता डेकोरेशनवाल्याने आपले कुटुंबाशी चांगले संबंध असल्याने पैसे घेतले नसल्याचं सांगितलं. ती मुलगी माझ्यासमोर मोठी झाली आहे, ते माझ्या कुटुंबासारखे आहेत..मी कसे पैसे घेणार असं त्याने सांगितलं. पण त्याला बंदुकीचा धाक दाखवत धमकावण्यात आलं, असं राऊत म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
पहले हिजाब, फिर किताब; हिजाब प्रकरणावरून महाराष्ट्रातील मुस्लिम तरूणांची बॅनरबाजी, म्हणाले..
‘ठाकरे सरकारच्या ठोकशाहीला ठोकण्याची माझ्यात नशा’, किरीट सोमय्यांनी पुन्हा साधला निशाणा
‘मी खोटा असतो तर एवढा खवून आन् उचकून लढलो नसतो भावानों’, किरण मानेंची आणखी एक पोस्ट चर्चेत
माझा लालूप्रसाद यादव करण्याची धमकी दिली, संजय राऊतांच्या लेटरबॉम्बने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ