एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे ते वाचवण्यासाठी शिवसेना नेत्यांचे प्रयत्न सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. (devendra fadanvis video conference with mla)
एकनाथ शिंदे यांच्या या बंडावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या बंडाचा भाजपशी संबंध असल्याचे म्हटले जात आहे. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाजप नेते शांत असल्याचे दिसून येत आहे. ते यावर कोणतीही लक्ष वेधून घेणारी भूमिका घेताना दिसत नाहीये. असे असताना एकनाथ शिंदे यांच्या या बंडामागे भाजप असल्याचा दावा वारंवार सत्ताधारी नेत्यांकडून केला जात आहे. पण यामध्ये भाजपचा हात नाही असे भाजप नेते म्हणताना दिसून येत आहे.
अशात देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या आमदारांशी संवाद साधला आहे. शनिवारी रात्री १५ आमदार हे देवेंद्र फडणवीसांशी बोलले असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे भाजप कोणती नवी खेळी करणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
आज देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीस चौथ्यांदा दिल्लीला जात आहे. त्यामुळे भाजप राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, बंडखोरी करणाऱ्या १५ आमदारांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे सत्ताधारी भाजपवर आरोप करताना दिसून येत आहे. आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्याने या बंडामागे भाजप असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
बंडखोर आमदारांसाठी राज्यपाल मैदानात, केंद्राच्या सुरक्षेनंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आमची अवस्था भिकाऱ्यासारखी..; बंडखोर मंत्र्याने व्यक्त केली मनातली खदखद
शिवसेनेला भगदाड! उदय सामंत काल उद्धवसाहेबांसोबत बैठकीत अन् आज गुवाहाटीत