devendra fadanvis talk about state minister | राज्यात शिंदे-भाजप सरकार येऊन आता तीन महिन्यांपेक्षा जास्त झाले आहे. या सरकारचा राज्यमंत्रिळाचा विस्तार होत नव्हता. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात होती. त्यानंतर काही खात्यांचा विस्तार करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सांगितले आहे. या विस्तारात राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. कारण गेल्यावेळेस ज्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला होता. तेव्हा फक्त कॅबिनेट मंत्र्यांचाच मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.
सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय १८ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे गटाचे ९ , तर भारतीय जनता पक्षाचे ९ मंत्री आहे. त्यामुळे आता कॅबिनेटनंतर आता राज्यमंत्रीही निवडले जाणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार आहे. सध्या मंत्रिमंडळात फक्त कॅबिनेट मंत्रीच आहेत. त्यामुळे अनेकांवर इतर विभागांचा पदभार आहे. राज्यमंत्री नसल्याने अनेकांवर अतिरिक्त मंत्रालयाचा पदभार आहे. तो कमी करण्यासाठी लवकरच राज्यमंत्र्यांची निवड केली जाणार आहे.
आधीच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या गटाला ९ कॅबिनेट मंत्रिपद मिळाली आहे. पण आता पुढच्या विस्तारात कोणाला किती मंत्रिपद मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाजपकडे १०६ आमदार आहे, तर शिंदे गटाकडे ५० आमदार आहे.
अशात एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदार आपल्यालाच मंत्रिपद मिळणार या भरोश्यावर बसलेले आहे. अनेकांनी तर तशी इच्छा माध्यमांसमोरही व्यक्त केली आहे. अशात काही आमदार पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे नाराजही दिसले. संजय शिरसाठ आणि बच्चू कडू यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली होती.






