सध्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या घडामोडींमुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभा निवडणूकीसोबतच विधानपरिषदेचीही चर्चा सुरु आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी दोन उमेदवारांना रिंगणात उतरवलं आहे. (devendra fadanvis selected this candidate for vidhan parishad)
तसेच भाजपनेही त्यांच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रवीण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि पाचव्या जागेवर उमा खापरे असणार आहे. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सहावी जागाही लढवणार असे म्हटले होते.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे निवडणूकीतील चुरस आणखी वाढली आहे. त्यामुळे राजकारणात वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या होत्या. सहावा उमेदवार कोण असेल याबाबत अनेकजण तर्क लावत होते. अखेर आता शेवटच्या क्षणी भाजपकडून सहाव्या जागेसाठी नाव जाहीर करण्यात आलं आहे.
आज देवेंद्र फडणवीसांच्या सागर या बंगल्यावर एक बैठक होणार आहे. या बैठकीला चंद्रकांत पाटील, आशिष शेलार उपस्थित असणार आहे. तसेच सदाभाऊ खोतही मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. भाजपकडून त्यांना बोलवण्यात आले असून उमा खापरे यांच्यासोबत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.
सदाभाऊ खोत हे रयतक्रांती संघटनेचे नेते आहे. गेल्या काही दिवसांपासून ते चांगलेच चर्चेत होते. महाविकास आघाडीवर ते निशाणा साधताना दिसून येत होते. त्यामुळे त्यांना विधानपरिषदेसाठी संधी मिळणार असे म्हटले जात होते. अशातच त्यांना मुंबईला बोलवल्यामुळे त्यांना संधी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, भाजपने आधी पाच उमेदवार जाहीर केले होते. तसेच त्या पाच उमेदवारांमध्ये सदाभाऊ खोत यांचे नाव नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांना ऐनवेळी डावलले अशी चर्चा रंगली होती. पण आता त्यांना थेट देवेंद्र फडणवीसांनीच आमंत्रण दिले आहे. त्यामुळे ते आता लवकरच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
गोपीनाथ मुंडेची ‘ती’ विनंती बाळासाहेबांनी एका क्षणात मान्य केली होती; उद्धव ठाकरेंनी सांगीतला किस्सा
नवी गाडी घेऊन देवदर्शनाला जाणाऱ्या गाडीचा अपघात; दोन भावांचा मृत्यू, आई – मुलगा गंभीर जखमी
ह्युंदाई, टाटाला मागे टाकत मारुती सुझुकीची ‘ही’ गाडी बनली नंबर वन, वाचा किंमत अन् फीचर्स