devendra fadanvis on savarkar | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिंदे गटाच्यावतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले आहे. तसेच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलही भाष्य केले आहे.
स्वातंत्र्य लढ्यातील सर्वच नेत्यांबद्दल मला आदर आहे. पण माझा प्रश्न आहे की, ज्याप्रमाणे अंदमानच्या कोठडीत सावरकांनी दुहेरी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. ११ वर्षे त्यांनी जे अत्याचार सहन केले तसा एक नेता मला दाखवा, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
तसेच इतके अत्याचार सहन करत असताना त्यांच्या मनात स्वातंत्र्य लक्ष्मीचीच पूजा होती. त्यांनी स्वातंत्र्य लक्ष्मीचेच गीत गायले. तेच गीत तिथे लिहिले. पण आजही त्यांच्या विचारांना कारावासात टाकण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून केले जाते. रोज खोटे बोलायचे, रोज चुकीचे सांगायचे आणि निर्लज्जपणे वागायचे हे राहूल गांधी करत आहे.त्यांना महाराष्ट्राची जनताच उत्तर देईन, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत जो हिंदुत्वाचा विचार आहे. सावरकरांना माहिती होते की, हा देश तोपर्यंत दुर्बल राहील, जोपर्यंत येथील हिंदु समाज आपली जातीव्यवस्था, वर्णभेद संपवून एकत्रित होणार नााही. त्यांना इतिहास माहिती होता. हिंदू समाज जेव्हा एकत्रित होता तेव्हा आक्रमण करण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, असे फडणवीसांनी म्हटले आहे.
हा हिंदू समाज दुर्बल झाला आहे. ज्यावेळी अपराध बोधाने हा हिंदू समाज ग्रसित झाला आणि ज्यावेळी जाती जातीत वर्णवर्णात हा हिंदू समाज विभागला गेला, त्यानंतर कधी मोगलांनी तर कधी इंग्रजांनी आपल्यावर राज केले. म्हणून स्वातंत्र्य मिळूनंही हा हिदू समाज मजबूत नसेल, असे फडणवीसा्ंनी म्हटले आहे.
हिंदू समाज हा या देशाचा आत्मा आहे. आत्माच नसेल तर देश कसा राहणार? हा आत्मा मजबूत नसेल तर हा देश पारतंत्र्यातच जाईल. म्हणून हिंदू समाजाला एकत्रित करण्याचे काम स्वातंत्र्यवीर सावरकर करत होते, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
अर्जून तेंडूलकरने लगावले ७ षटकार; नंतर घातक गोलंदाजीच्या जोरावर एकहाती जिंकवला सामना
harhar mahadev : बाजीप्रभूंचं मूळ नाव, गाव कोणतं? हर हर महादेव सिनेमावर वंशजांचे ‘हे’ मोठे आक्षेप, वाचा नेमके मुद्दे काय?
vinayak mete : ‘या’ व्यक्तीमुळेच झाला विनायक मेटेंचा मृत्यू, सीआयडीच्या तपासात धक्कादायक माहिती उघड