Share

भाजप-मनसे युती पक्की? देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

गुढी पाडव्यानिमित्त शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले होते. तसेच यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश सरकारचे कौतूकही केले होते. तसेच त्यांनी भाजपवर निशाणा न साधता सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला होता. (devendra fadanvis on raj thackeray meeting)

राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरेंच्या भाषणामुळे मुंबई महापालिका निवणूकीसाठी भाजप-मनसे युतीबाबत पुन्हा चर्चा रंगल्या आहे. अशात नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनीही राज ठाकरे यांच्या भेटीचे संकेत दिले आहे. त्यामुळे आता महापालिका निवणूकीत भाजप-मनसे युती पक्की असल्याचे समजले जात आहे. गडचिरोली येथे देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी भेटीबाबत भाष्य केले आहे.

राज ठाकरे आणि माझे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहे. त्यामुळं आमच्या दोघांची भेट होणं ही आश्चर्याची गोष्ट नाही. भेटीनंतर आम्ही कोणत्या विषयावर बोलायचं हे आम्हाला ठरवू द्या. थोडी वाट पाहा, काय होतंय ते तुमच्या लक्षात येईलच, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

दरम्यान, नितीन गडकरी यांनी रविवारी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. ते दोघेही त्यांच्या निवासस्थानी भेटले होते. या दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. त्यानंतर गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. तसेच भेटीचे कारणही सांगितले होते.

आमची राजकीय भेट नव्हती. त्यांच्या आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांना भेटलो. तसेच त्यांचे नवीन घर पाहण्यासाठी मी त्यांची भेट घेतली, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. त्यानंतर लगेचच आता देवेंद्र फडणवीसांनीही राज ठाकरेंच्या भेटीबद्दल वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
टाटांचा मास्टरप्लॅन! आता सगळ्या वस्तू मिळणार एकाच ठिकाणी; रिलायन्स, प्लिपकार्ट-ऍमेझॉनला बसणार धक्का
‘ही’ कार खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड, महिन्याभरात झाले १० हजार बुकींग्स, वाचा किंमत आणि फिचर्स
५ लाखांच्या बदल्यात व्हायचा १५ लाख देण्याचा सौदा, पण बॉक्समधून निघायचं भलतंच काही, पोलिसांनी केला पर्दाफाश

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now