महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आहे. पण या दौऱ्याला एक भाजप खासदार विरोध करताना दिसून येत आहे. या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी विरोध केला आहे. अयोध्येत येण्याआधी त्यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर त्यांनी इथे यावे, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. (devendra fadanvis on raj thackeray ayodhya tour)
राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला जाणार आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याला महाराष्ट्र भाजपनेही पाठिंबा दिला आहे. पण उत्तर प्रदेशातल्या भाजप खासदारानेच याला विरोध केल्यामुळे हा दौरा चर्चेत आला आहे. आता या प्रकरणी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी केलेल्या विरोधावर देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केले आहे. राज ठाकरेंना अयोध्येला जायचंय, त्यांना जाऊद्या. त्यांना विरोध करण्याचं काहीच काम नाही, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी ब्रिजभूषण सिंग यांना केले आहे.
राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला ब्रिजभूषण सिंग का विरोध करत आहे? हे मला माहित नाही. माझं याविषयी त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाही. राज ठाकरेंना विरोध करण्याचं कारण मला समजलेलं नाही. माझं स्पष्ट मत आहे. रामाच्या शरणात जो जात असेल, त्याला जाऊ दिलं पाहिजे. कोणलाही रोखण्याचं, विरोध करण्याचं कारण नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकार मुंबईत ऑफिस उघडणार यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे. सगळ्या राज्यांची भवने येथे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशचं एखादं ऑफिस इथे काढलं तर हरकत नाही आणि त्यामुळे लगेच घाबरुन जाण्याचीही गरज नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.
दरम्यान, माझा महाराष्ट्राला विरोध नाहीये. पण आमच्या लोकांना मनसेने खुप मारले आहे. मी त्याचा विरोध करत आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंना माफी मागितल्याशिवाय इथे येऊ देणार नाही, असे ब्रिजभूषण सिंग यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंना आपण विमानतळावरच थांबवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
माणसं जमा करायला अजूनही राजसाहेबांचाच आधार घ्यावा लागतोय का? मनसेचा शिवसेनेला टोला
अंडरग्राऊंड झालेले गणेश नाईक प्रकटले, लैगिंक छळाच्या आरोपांवर म्हणाले, काहींना राजकारणात…
काश्मिर फाईल्समुळे सिंगापुरमध्ये उडाला गोंधळ, बंदी घालण्याची तयारी सुरू, वाचा नेमकं काय घडलं?