Share

मागील जन्मात मी झाशीची राणी आणि तात्या टोपेंसोबत लढत असेल; फडणवीसांचे मोठे वक्तव्य

devendra fadanvis

एकीकडे राज्यात भोंग्यांच्या मुद्यावरुन वाद सुरु आहे. तर दुसरीकडे बाबरी मशिद कोणी पाडली असा शिवसेना विरुद्ध भाजप वाद सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस खुपच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका सभेत बोलताना, शिवसेनेचा एकही नेता बाबरी पाडायला नव्हता, असे फडणवीसांनी म्हटले होते. (devendra fadanvis on aditya thackeray statement)

तसेच देवेंद्र फडणवीसांनी बाबरी पाडणाऱ्या ३२ भाजप नेत्यांची नावे देखील घेतली होती. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. अशात राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती.

सोमवारी बेस्ट उपक्रमाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या कॅन्टीनच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा, आम्ही सर्वासामान्यांच्या प्रश्नासाठी लढतोय. आम्ही मूळ मुद्यावर काम करतोय. महाविकास आघाडी सरकार हे लोकांची काम करतंय. लोकांची चूल कशी पेटती राहिल, याकडे आम्ही लक्ष देतो, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले होते.

तसेच फडणवीसांनी बाबरी पाडली असे वक्तव्य केले, त्यावरही आदित्य ठाकरेंनी भाष्य केले. १८५७ च्या उठावामध्ये पण फडणवीसांचे योगदान असेल, असा टोला आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लगावला होता. आता त्याला फडणवीसांनी उत्तर दिले आहे.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले मर्सिडिज बेबी आहे ते. त्यांना ना संघर्ष करावा लागला, ना पाहावा लागला. त्यामुळे कारसेवकांची थट्टा ते करु शकतात, पण त्यांनी कितीही खिल्ली उडवली तरी तिथे होतो याचा गर्व आम्हाला आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

तसेच मी हिंदु असल्याने मागील आणि पुढील जन्मावर माझा विश्वास आहे. त्यामुळे मागील जन्म असेल तर कदाचित १८५७ च्या युद्धात मी तात्या टोपे आणि झाशीच्या राणीसोबत लढत असेन. तिथे तुम्ही असाल तर तुम्ही इंग्रजांसोबत युती केली असेल. कारण आता तुम्ही ज्यांच्याशी युती केली, ते १८५७ ला युद्धच मानत नाही, ते शिपायांचे बंड मानतात असाही टोला देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-
राज्यातील भोंग्यांच्या वादात आता सोनू सूदची उडी; राज ठाकरेंच्या भूमिकेवर म्हणाला, हनुमान चालिसा…
प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या भिडे गुरुजींवर मुस्लीम डॉक्टराने केले उपचार; स्वत:चा पुरस्कार सोहळा केला रद्द
अक्षया देवधरच्या साखरपुड्याच्या पोस्टवर तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केली कमेंट, म्हणाला…

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now