एकनाथ शिंदे यांचा बंडखोरीचा गट मजबूत होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सत्ता वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अशात भाजपही आपली सत्ता स्थापन करण्यासाठी सक्रीय झाल्याचे म्हटले जात आहे. (devendra fadanvis meet governmener)
एकनाथ शिंदेंच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी देताना न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली. न्यायालयाने उपसभापती अजय चौधरी, सुनील प्रभू आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पाच दिवसांत या नोटीसला उत्तर द्यावे, असे म्हटले आहे.
आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जूलै रोजी होणार आहे. तसेच आमदारांनी १२ जूलैपर्यंत आपली बाजू मांडावी असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. पण तोपर्यंत शिवसेनेला बंडखोर आमदारांवर कारवाई करता येणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजपची बैठक झाली होती. त्यात सरकार स्थापनेबाबत चर्चा झाल्याची माहिती होती.
अशात महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. विरोक्षी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. या भेटीत देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले होते. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे बहुमत चाचणीची मागणी केली आहे.३० तारखेला बहुमत चाचणीसाठी सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
तसेच बहुमत चाचणीच्या व्हिडिओ शुटींगचीही मागणी करण्यात आली आहे. त्याचदिवशी त्याबाबत निर्णय द्यावा, असे फडणवीसांनी राज्यपालांना सांगितले आहे. यावेळी बंडखोर आमदारांच्या सुरक्षेबाबतही फडणवीसांनी राज्यपालांशी बोलणे केले आहे. दरम्यान, राज्यपालांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण सध्या सोशल मीडियावर राज्यपालांनी बहुमत घेण्याचे आदेश दिल्याचे एक पत्र व्हायरल होत आहे, ते खोटे आहे.
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! बंडखोरी करणारे २५ आमदार मुख्यमंत्र्यांना भेटण्याची शक्यता, गुवाहटीतच बनवलाय स्वतंत्र गट
केंद्र सरकारची भन्नाट योजना; पत्नीच्या नावाने खाते खोलून मिळवा दरमहा ४५ हजार रुपये
नुपूर शर्माचे समर्थन करणाऱ्या कन्हैयालालचा गळा चिरून जारी केला व्हिडीओ अन् थेट मोदींना दिली धमकी