Share

“भोंगे काढायला लावले, तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली”

राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हिंदुत्व या मुद्यावर वाद सुरू आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर भाष्य केले होते. तसेच त्यांनी भाजपवरही निशाणा साधला होता. (devendra fadanvis criticize uddhav thakckeray)

बाळासाहेब ठाकरे हे भोळे होते. भाजपने त्यांना वेळोवेळी कशाप्रकारे फसवले आहे. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे मी भाजपशी धुर्तपणे वागतो, असे मोठे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. तसेच माझ्या रक्तातच हिंदुत्व आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

आता मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना सुनावलं आहे. भोंगे काढायला लावले तर हातभर फाटली आणि हे म्हणतात बाबरी आम्ही पाडली, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

तसेच तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. हिंदुत्व ही अशी व्याख्या आहे की जिने जीवनाचा मार्ग दाखवला. तुमच्या सरकारमधील मंत्री भ्रष्टाचार करुन जेलमध्ये गेलेत. म्हणूनच महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेलीये, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

तसेच अयोध्यत मशिद होती, मी हे मानत नाही. तो ढाचा होता. हिंदु कधी मशिद पाडू शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतोय आम्ही केलंय. तुम्ही विचारता बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता? मी अभिमानाने सांगतो, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी मी त्याच ठिकाणी होतो. एवढंच नाही, राममंदिराच्या कारसेवेसाठी १८ दिवस जेलमध्ये होतो. लाठ्या-काठ्या खाण्याचं काम मी त्या ठिकाणी असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे.

बाबरी पाडली तेव्हा महाराष्ट्रातून एकही नेता तिथे गेला नव्हता. एकही शिवसैनिक तिथे हजर नव्हता. बाबरी मशिद पडली त्यावेळी ३२ आरोपी होते. त्यात भाजप नेते लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंगजी, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा, रामविलास वेदांती आणि त्यातला एक आरोपी मंचावर आहे, यामध्ये एकही शिवसेना नेता नाही. आमचा दोष एवढाच आहे, आम्हाला प्रसिद्धी करता आली नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांना हिंदू शब्दाचीच ॲलर्जी – राज ठाकरेंचा घणाघात
यांच्या तोंडात बोळा कोंबा, यांना सरळ शब्दांत सांगून कळत नसेल तर…; सभेस्थानी अजान होताच राज संतापले
“बाळासाहेब ठाकरे भोळे होते, भाजपने वेळोवेळी त्यांना फसवले आहे, हे मी डोळ्यांनी पाहिलंय- उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now