Share

फडणवीस विरुद्ध ठाकरे: हिंदुत्व, मोदी अन् भाजपा-सेना युतीवरुन आता माजी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

udhav thackeray

रविवारी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे (udhav thcakeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर निशाणा साधत काळजीवाहू विरोधक पूर्वी मित्र होते ही खंत आहे कारण आपणच त्यांना पोसले. आपली २५ वर्षे युतीमध्ये सडली. यांना राजकारणाचे गजकर्ण झाले आहे अशी टीका केली. (devendra fadanvis criticize on udhav thcakeray)

ठाकरेंच्या या टीकेला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उत्तर दिले. “सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्याने उद्धव ठाकरेंच्या भाषणात पहायला मिळाल्या. २५ वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले. पण २०१२ पर्यंत या युतीचे नेते हे स्वत: वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का?” असे ते म्हणाले.

तसेच भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का, असा सवाल आमच्या मनात येतो, असा हल्लाबोल त्यांनी केला. पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘फडणवीस म्हणाले, तुमची सिलेक्टिव्ह विसरण्याची पद्धत आहे. तुमचा पक्ष जन्माला येण्यापूर्वी मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते.’

दरम्यान, 1984 मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. शिवसेनेच्या नाही. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. फडणवीस म्हणाले की, भाजप सोबत लढलो असं सांगताना, हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले. याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. तेच तेच मुद्दे असतात.’

‘मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावलं गेलं ते कशासाठी? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावलं गेलं कारण त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता,’ असा गंभीर आरोप राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (udhav thackeray) यांनी केला होता.

यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, ‘भाजप आपल्यावर टीका करतात की आपण मोदी-शहांच्या चेहऱ्याचा वापर केला तर तसेच भाजपनेही आपल्या चेहऱ्याचा वापर केला आहे, असं आपण म्हणू शकतो. याचे कारण असे की, मोदी आणि शहांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला आपल्याला आग्रहाने बोलावलं गेलं ते कशासाठी? अत्यंत आग्रहाने यासाठी बोलावलं गेलं कारण त्यांनाही आपल्या चेहऱ्याचा वापर करायचा होता.’

महत्त्वाच्या बातम्या
ज्या मातांना सरोगसीने रेडीमेड मुलं मिळतात त्या मातांना.., प्रियंका चोप्रा आई झाल्यानंतर लेखिकेचा सवाल
मनसे स्टाईल राष्ट्रवादीत चालणार नाही; रुपाली पाटलांना थेट अजितदादांनीच दिले शिस्तीचे धडे
‘असे न केल्यास आम्हाला आनंद होईल’, वामिकाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनुष्का भडकली
lata mangeshkar health update: लता मंगेशकर यांच्या तब्येतीबाबत खोट्या बातम्या व्हायरल, तब्येतीत झालीये सुधारण

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now