राज्यात सध्या नवीन सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. त्यानंतर सरकार वेगवेगळे निर्णय घेताना दिसून येत आहे. पण त्यांच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेते टीका करताना दिसून येत आहे. (devendra fadanvis criticize ajit pawar)
शिंदे आणि फडणवीस सरकारने महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती दिली आहे. आता सरपंच आणि उपसरपंचाची निवड ही लोकांमधून केली जाणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला गेला तर पैशांची खेळी होत नव्हती, म्हणून त्यांनी तो बदल केला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी महत्वाचे निर्णय घेतले आहे. बैठकीनंतर त्यांनी बैठकीत झालेले निर्णय सांगण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवारांना टोला लगावला आहे.
सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय आम्ही थांबवला आहे. कारण थेट सरपंच आणि नगराध्यक्ष निवडला गेला तर पैशांची खेळी करता येत नव्हती. हे काँग्रेस आणि राष्ट्रावादीच्या लक्षात आलं होतं.त्यावेळी सर्वात जास्त नगराध्यक्ष आमचेच लोक निवडून जात होते. हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय रद्द केला होता, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुळात महाराष्ट्राचं नाहीतर सगळ्याच राज्यांमध्ये थेट सरपंचाची निवडणूक होत आहे. काही राज्यामध्ये महापौरांची लोकांमधून निवडणूक होत असते. आमच्या डोळ्यांपुढे महापौरांची लोकांमधून निवडणूक होत असते. त्यामुळे अजितदादा जे बोलताय ते पराभव दिसत असल्यामुळे बोलत आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव लोकनेते दी बा पाटील असे करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या-
तो देवेंद्र बघा कसं ओढायला लागलाय, आज माईक ओढायला सुरुवात केली, उद्या पॅन्ट ओढेल
मेलेल्या डासामुळे सराईत गुन्हेगाराचा लागला शोध, पोलिसांची अशी झाली मदत, वाचून अवाक व्हाल
”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदर आहे पण आमच्या मनात मुख्यमंत्री म्हणून फडणवीसच”






